राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मडलिक आखाड्याचे यश

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मडलिक आखाड्याचे यश

Published on

4831
मुरगूड : सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथे झालेल्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या संघासोबत आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक दादा लवटे, क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी व शासकीय कुस्ती मार्गदर्शक दत्ता माने.
.....
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत
मंडलिक आखाड्याचे यश

महिला कुस्तीगीरांनी ८ पदकांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. ९ : सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सुरू असलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मुरगूडच्या
लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुलमधील विविध वजनी गटांतील आठ महिला कुस्तीगिरांनी ५ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्य अशी एकूण आठ पदके मिळवून संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व राखले.
स्पर्धेत महिला विभागात दहा वजन गटांपैकी पाच वजन गटांत मंडलिक आखाड्यातील महिला कुस्तीगिरांनी ५ सुवर्णपदके, एक रौप्यपदक व दोन कांस्यपदके मिळवत कोल्हापूर जिल्ह्याला सांघिक विजेतेपद मिळवून दिले. तसेच पुरुष कुस्तीगिरांनी ग्रीको रोमन स्टाईलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. सुशांत साहेबराव पालवे याने ७२ किलो, तर रोहन रंगराव रंडेने ९७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले.
पदक विजेत्या महिला कुस्तीगीर अशा, कंसात वजन गट : गौरी मधुकर पाटील (५० किलो ) सुवर्णपदक, स्वाती संजय शिंदे (५३ किलो) सुवर्णपदक, तन्वी गुंडेश मगदूम (५९ किलो ) सुवर्णपदक, शिवानी बिरू मेटकर (६८ किलो ) सुवर्णपदक, अमृता शशिकांत पुजारी (७६ किलो) सुवर्णपदक, स्नेहल शिवाजी पालवे (५९ किलो ) रौप्यपदक, नेहा किरण चौगले (५५ किलो) कास्यपदक आणि संज्योती संजय पाटील (५९ किलो) कांस्यपदक.
विजेत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक दादा लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com