संक्षिप्त

संक्षिप्त
Published on

सराफ बाजार
शनिवारी सुरू

कोल्हापूर ः दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १२) सराफ बाजार सुरू राहणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेश राठोड यांनी दिली. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या या सणाच्या मुहुर्तावर सोने खरेदीची परंपरा आहे. मात्र, यंदा शनिवार असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सराफ बाजार सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
............
पंचगंगेचे आज
पाणीपूजन

कोल्हापूर ः येथील बंगाली कारागिरांच्या सार्वजनिक श्री दुर्गा उत्सवाला कालपासून उत्साहात प्रारंभ झाला. मंडळाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. उद्या (गुरुवारी) सकाळी सात वाजता मंडळाच्या २५ महिला पंचगंगा नदीच्या पाण्याचे पूजन करणार आहेत. ते पाणी कलशातून दुर्गादेवीला अर्पण करतील. शुक्रवारी (ता. ११) अष्टमीची पूजा होईल आणि शनिवारी (१२) दुपारी दोन वाजता विसर्जन होणार असल्याचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक यांनी सांगितले. दैवज्ञ बोर्डिंग येथे उत्सव सुरू असून दुर्गादेवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
.........
17940
फॅशन वीकसाठी
साक्षी शाह यांची निवड

कोल्हापूर ः येथील एनआयएफडी ग्लोबल संस्थेची विद्यार्थिनी साक्षी शिंदे यांची लॅक्मे फॅशन वीक एक्स ‘एफडीसीआय’च्या इम्प्लिमेंटेशन टीमसाठी निवड झाली. तेरा ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील हॉटेल दि ग्रॅंड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
भारतातील एक प्रतिष्ठित फॅशन कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाची ओळख आहे. देशातील प्रमुख डिझायनर्स, मॉडेल्स आणि फॅशन तज्ज्ञांचा त्यामध्ये सहभाग असतो. एनआयएफडी ग्लोबल संस्थेने नेहमीच विद्यार्थ्यांना अनेक संधी दिल्या आहेत. फॅशन डिझाइन आणि इंटेरिअर डिझाइनचे अनेक विद्यार्थी लंडनमध्ये एक महिन्याच्या निवास कार्यक्रमात सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांना दुबई फॅशन वीकमध्येही सहभागी होण्याचा सन्मान मिळाला असल्याचे केंद्रप्रमुख वेदिका शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com