आजऱ्याच्या आयटीआयला मृत्युंजकाराचे नाव

आजऱ्याच्या आयटीआयला मृत्युंजकाराचे नाव

Published on

आजऱ्याच्या आयटीआयला
मृत्युंजयकारांचे नाव
आजरा, ता. ९ ः शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील १०६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल केला आहे. त्यानुसार आजऱ्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला प्रसिध्द साहित्यिक मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे नाव मिळणार आहे. यापुढे शिवाजी सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखला जाणार आहे.
राज्यात ४१९ शासकीय, तर ५८५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी १०६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावाला ४ ऑक्टोबर २०२४ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा समावेश आहे.
-----------------
चौकट
अन्य संस्थांची नवीन नावे अशी
सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज, सेनापती संताजी घोरपडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरगूड (ता. कागल), वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हातकणंगले, हुतात्मा नारायण वारके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुदरगड, बाजीप्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाहूवाडी, शिवा काशीद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पन्हाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com