जिल्हा ज्युदो असोसिएशन संघाचे यश
17948
कोल्हापूर ः डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघातील मुझफ्फर सुभेदार याने सुवर्णपदक पटकावले. यावेळी मुझफ्फरसह इतर पदकविजेते खेळाडू.
............
राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत
जिल्हा असोसिएशन संघाचे यश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः डेरवण (रत्नागिरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या खेळाडूंनी यश मिळवले. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. पुनित बालन ग्रुप प्रस्तुत ही राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर स्पर्धा झाली. राज्यभरातून २८ जिल्ह्यांतील ५३५ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनने स्पर्धेचे संयोजन केले.
कोल्हापूर ज्यूदो असोसिएशनच्या मुझफ्फर सुभेदार याने कॅडेट गटात सुवर्णपदक, तर पूर्वा सोहनी, व्यंकटेश हराळे यांनी ब्राँझ पदके पटकावली. शौर्य पाटोळे, अद्वैत पोतदार यांचाही स्पर्धेत सहभाग होता. त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील ज्यूदोचे संस्थापक अण्णासाहेब पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, पंधरा ते अठरा वर्षांखालील कॅडेट गटात १४४ मुले आणि १२९ मुली, तर पंधरा ते एकवीस वर्षांखालील ज्युनियर गटामध्ये १४५ मुले आणि ११७ मुली सहभागी झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

