आंतरविभागीय स्पर्धांमध्ये शरद पॉलिटेक्निकचे यश

आंतरविभागीय स्पर्धांमध्ये शरद पॉलिटेक्निकचे यश
Published on

18870
पुणे : येथे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन वार्षिक सभेत मान्यवरांकडून सन्मान स्वीकारताना प्रा. एस. आर. भरमगोंडा
.......
आंतरविभागीय स्पर्धांमध्ये
शरद पॉलिटेक्निकचे यश

पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सर्वसाधारण सभेत सत्कार

सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. २२ ः यड्राव (ता. शिरोळ) येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी विविध विभागीय व आंतरविभागीय स्पर्धेत यश मिळविले आहे. त्यामुळे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशनमार्फत सन्मान करण्यात आला. पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला.
विभागीय स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकच्या मुलींनी व्हॉलीबॉल, कॅरम, शॉट पूट, उंच उडी प्रकारात प्रथम, तर खो-खो, बुद्धिबळ, थाळी फेक, लांब उडी प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला. मुलांनी कुस्ती (७४ किलो), थाळी फेक, वजन उचलणे (६९ किलो) प्रकारात प्रथम, तर वजन उचलणे (७७ व १०५ किलो), धावणे रिले (४०० मीटर) प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला.
आंतरविभागीय स्पर्धेत मुलींनी उंच उडीमध्ये प्रथम, व्हॉलीबॉलमध्ये द्वितीय तर मुलांनी थाळी फेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. विविध स्पर्धातील यशामुळे संस्थेचा असोसिएशनकडून सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य बी. एस. ताशीलदार यांचे सहकार्य, तर प्रा. एस.आर. भरमगोंडा, एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Goa’s Siddhesh Naik Emerges Champion in High-Octane Off-Road Event
शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विनय तावरे प्रथम; तिघांची JEE Advanced परीक्षेसाठी निवड.  सीबीएसइ बारावी परीक्षेत विद्यालयाचे घवघवीत यश
न्यू हायस्कूल वडाळा शाळेची अनुष्का किरण जमदाडे ९५ टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम  दहावी परिक्षेतही तालुक्याच्या गुणवत्तेत मुलींनीच मारली बाजी  मार्डीची राजनंदिनी गिरे व बाळे येथील अफ्रीन शेख या दोघींचा तालुक्यात दुसरा क्रमांक
Marathi News Esakal
www.esakal.com