

निवडणुकीसाठी पालिकेतील
४६४ अधिकारी, कर्मचारी
कोल्हापूर ः विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेतील ४६४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे आगामी महिनाभरात महापालिका कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी दिसणार आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध कामांसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातात. लोकसभा निवडणुकीलाही कर्मचारी नियुक्त केले होते. त्यामुळे महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाला होता. गेल्या निवडणुकीप्रमाणे महापालिकेतील नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवली आहे. त्यामध्ये ४६४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे नियुक्ती आदेश काढण्यापूर्वीच ती नावे वगळण्यासाठीची स्वतंत्र यादी तयार करायला सांगितली आहे. काही विभागातील कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट नसतात. त्याबाबत काही अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. इतरांना काम नसते का अशी विचारणा होत आहे. त्यामुळे काही वगळल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे नव्याने समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.