मित्रांमध्ये रूबाबासाठी चोरल्या दुचाकी

मित्रांमध्ये रूबाबासाठी चोरल्या दुचाकी
Published on: 

मित्रांमध्ये रुबाबासाठी चोरल्या दुचाकी
अल्पवयीन चोरटा ताब्यात ः तीन मोटार सायकली जप्त

कोल्हापूर, ता. १७ ः वडिलांचे छत्र हरपल्याने आई कष्टाने त्याला वाढवत होती. काळजीपोटी घरातील दुचाकी त्याला दिली नाही. पण शिक्षणात कच्चा असल्याने अर्धवट शाळा सोडलेल्या ‘त्याला’ मित्रांमध्ये रुबाबासाठी दुचाकी लागायची. यामुळे त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागातून थेट दुचाकी चोरूनच त्यांचा वापर स्वतःच्या रुबाबासाठी केला. राजारामपुरी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या अल्पवयीन संशयिताकडून चोरीच्या तीनही दुचाकी जप्त केल्या.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महाद्वार रोडवरून एक दुचाकी चोरीस गेली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे अमलदार युक्ती ठोंबरे व संदीप सावंत यांना या चोरीविषयी एक महत्त्वाची माहिती हाती लागली. त्यांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरूवात केली. यातील एका कॅमेऱ्यात दिसलेला संशयित त्यांच्या रडारवर आला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनीही तपासाची सूत्रे गतिमान करून संशयित चोरट्याला ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली. परंतु त्याच्याकडे सखोल चौकशी करताच त्याने प्रतिभानगरातील हॉस्‍पिटलमधून ३० जून रोजी, राजारामपुरी आठव्या गल्लीतील इमारतीच्या बेसमेंटमधून ८ ऑक्टोबरला आणखीन दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकी घेऊनच तो वावरत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.