

‘थेट पाईपलाईन’द्वारे
उद्यापासून पाणीपुरवठा
दुरुस्तीची कामे युध्दपातळीवर सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः थेट पाईपलाईन योजनेच्या देखभालीच्या कामाला महापालिकेने आजपासून प्रारंभ केल्याने ए, बी, ई वॉर्ड, कसबा बावडा असा निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. उद्या (ता.२३) दुपारपर्यंत काम पूर्ण केले जाणार असून, गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. दोन दिवस पाणीपुरवठ्यासाठी १४ टॅंकरची व्यवस्था केली आहे. आज त्याद्वारे १७ फेऱ्या झाल्या.
सध्या पाऊस जोरदार तडाखा देत आहे. त्यातून झाडे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीत पाणीपुरवठा बंद होऊ नये, याची खबरदारी म्हणून योजनेतील जलवाहिनी, तसेच वीजवाहिनीच्या देखभालीची कामे केली जात आहेत. वीजवाहिनींवर येणाऱ्या धोकादायक फांद्याही काढल्या जात आहेत. तसेच पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातीलही विविध देखभालीची, पाण्याच्या टाकीची स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. यामुळे आज सकाळपासून थेट पाईपलाईन योजनेचा उपसा बंद करण्यात आला. तोपर्यंत सकाळच्या सत्रातील भागात पाणीपुरवठा झाला. त्यानंतर पुरवठा होणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा बंद झाला.
दोन दिवस पाणी बंद राहणार असल्याने महापालिकेचे चार व भाडेतत्त्वावर घेतलेले १० असे १४ टँकर तैनात केले आहेत. त्याव्दारे आज कळंबा फिल्टर हाऊसवरून सात, तर कसबा बावडा फिल्टर हाऊसवरून १० फेऱ्यांद्वारे पाणीवितरण करण्यात आले. उद्या दुपारपर्यंत सर्व ठिकाणची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर योजनेचा उपसा सुरू करून नंतर पाणी वितरण केले जाणार आहे. त्यामुळे रात्री काही भागांत पाणी मिळू शकते, पण गुरुवारपासूनच सर्व भागांत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.