

निवासी फुटबॉल केंद्रासाठी एकत्र या...
..............
20586
जय मेथे
शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी निवासी केंद्र हवेच
शहरातील अनेक शाळांमध्ये कबड्डी, खो-खो या पारंपारिक खेळांसोबत फुटबॉल, हॉकी, हँडबॉल, क्रिकेट, सॉफ्टबॉल आदी खेळ खेळले जातात. विशेषतः अनेक शाळांमध्ये फुटबॉल खेळाला महत्त्व अधिक प्राप्त झाले आहे. यासाठी शाळांनी विशेष प्रशिक्षणवर्गही सुरू केला आहे. त्यातूनच अनेक शाळांचे खेळाडू जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहेत. त्यापैकी मीसुद्धा याचाच एक भाग आहे. मात्र, शाळांमधून मिळणारे प्रशिक्षण हे त्या स्पर्धेपुरतेच मर्यादित असते. पुढे त्याचा उपयोग खुल्या वरिष्ठ गटातून खेळताना होत नाही. त्या स्तरावरील खेळाची तंत्रे वेगळी असतात. विशेषतः विना इजा खेळणे मोठी जिकिरीचे बनले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षणाची सध्याच्या घडीला मोठी आवश्यकता आहे. संतोष ट्रॉफी, व्यावसायिक फुटबॉल संघ व स्पर्धांमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रांतून मिळालेल्या प्रशिक्षणाचीच गरज भासते. या प्रशिक्षणाच्या जोरावरच स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करता येते. क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी केंद्रासारखीच परदेशात खास फुटबॉलचेच तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या अकादमी आहेत. त्याचा लाभ तेथील नवोदित खेळाडूंना होतो. अशाच पद्धतीने पूर्वीप्रमाणे कोल्हापूरातही जसे होते तसे सर्व सोयीनियुक्त निवासी फुटबॉल केंद्र पुन्हा सुरू होणे काळाची गरज आहे.
- जय मेथे, राष्ट्रीय फुटबॉलपटू
.......
20585
अभिजित चौगले
निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींनी प्राधान्य द्यावे
विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार निवडून येईल, त्या उमेदवारांनी खास फुटबॉल खेळाडूंच्या निवासी प्रशिक्षण केंद्राचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. आमच्यासारख्या फुटबॉल खेळाडूंनी संघाचे म्होरके समजावतील त्याप्रमाणे वरिष्ठ स्पर्धांमध्ये खेळ केला. त्याचे बरे-वाईट परिणाम स्पर्धेनंतर पुढे आले. विशेषतः तंत्रशुद्ध प्रशिक्षण नसल्याने अनेकांना दुखापतींना सामोरे जावे लागले. खेळातील कौशल्ये आणि विशिष्ट प्रकारचा सराव करून घेणे आवश्यक असते. अनेक शाळांमधून क्रीडा शिक्षकच प्रशिक्षकाची भूमिका बजावतात. मात्र, त्या त्या वेळचे खेळ आणि तंत्रे वेगवेगळी राबविली जात होती. त्याचा थेट परिणाम स्पर्धेपुरताच होता. आता नवोदितांना व्यावसायिक संघ, स्पर्धांचे दरवाजे खुले झाले आहेत. ज्याचा खेळ सवोत्कृष्ट असेल त्याला संघात स्थान मिळते. त्यातही खेळाडूचा कस लागतो. अनेकदा क्षमता असूनही शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण नसल्याने अनेक मुली-मुले मागे पडत आहेत. आता स्थानिक नवोदितांना क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी फुटबॉल केंद्राची नितांत गरज आहे. गेले चार महिने ‘सकाळ’मधून कोल्हापुरात फुटबॉलचे निवासी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी पाठपुरावा केला जात आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यासाठी प्राधान्य द्यावे.
- अभिजित चौगले, फुटबॉलपटू
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.