

20631
स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता
असोसिएशनतर्फे दिवाळी साहित्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः येथील कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनतर्फे विक्रेते व एजंटांना दिवाळी फराळ साहित्याचे वितरण झाले. सलग चौदाव्या वर्षी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात आला.
वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्याकडून दरमहा ठराविक निधी भिशीच्या माध्यमातून जमा करून घेण्यात येतो. दिवाळीपूर्वी जमा झालेल्या रकमेतून भेटवस्तू खरेदी करण्यात येते. भेटवस्तूमध्ये दिवाळीतील फराळ, फराळासाठी लागणाऱ्या वस्तू किराणा दुकानातून होलसेल खरेदी करण्यात येते. अप्रत्यक्षपणे भिशीमध्ये पैसे साठत गेल्याने महागाईतही फराळासारख्या खर्चिक वस्तू माफक दरात मिळत असल्याने संघटनेचा एक मदतीचा हात लाभतो. शंभरहून अधिक सभासदांना त्याचा लाभ मिळतो.
राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे संघटक रघुनाथ कांबळे यांनी दिवाळी भेट उपक्रम भविष्यात अधिक व्यापक करणार असल्याचे सांगितले. संघटनेचे संचालक सतीश दिवटे यांनी दिवाळी भेट योजनेचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, अंकुश परब, सुरेश ब्रह्मपुरे, प्रफुल्ल कोतमिरे, संजय बुचडे, परशराम सावंत, अंकुश परब, सुरेश ब्रह्मपुरे, सागर रुईकर यांच्यासह राजारामपुरी डेपो, संभाजीनगर डेपो, कावळा नाका डेपो, भाऊसिंगजी रोड डेपोचे विक्रेते व एजंट उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.