

20679
घुसखोरीविरोधात पक्षांनी
रोखठोक भूमिका घ्यावी
ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांचे आवाहन
कोल्हापूर, ता. २२ ः ‘राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीविरोधात रोखठोक भूमिका असली पाहिजे. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा,’ असे प्रतिपादन सुदर्शन टीव्हीचे सुरेश चव्हाणके यांनी केले. कळंबा येथे शिव प्रेरणा यात्रेअंतर्गत सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. प्रबोधन मंच व सकल हिंदू समाज यांच्यातर्फे मेळाव्याचे आयोजन केले होते.
चव्हाणके म्हणाले, ‘ निवडणूक आयोगाने व्होट जिहाद संदर्भात भूमिका घेतली असली तरीही वीस वर्षांपासून आपण या संदर्भात जनजागरण करीत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीवेळी प्रकर्षाने व्होट जिहादची तीव्रता आणि परिणाम निवडणूक आयोगासह सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. निवडणुकीपुरतेच नव्हे तर बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाने नेहमी संघटित राहावे. आगामी निवडणुकांमध्ये हिंदू जाहीरनामा तयार करून तो सर्व पक्षांसमोर हिंदुत्ववादी संघटनांनी राष्ट्रीय भूमिकेतून ठेवावा. त्याविषयी पक्ष व उमेदवारांची भूमिका जाहीर करून घ्यावी. समाजहितासाठी याची दखल सर्व राजकीय पक्ष घेतील. यासाठी व्यापक प्रमाणात प्रबोधन करावे.’ महालक्ष्मी प्रतिमा देऊन सुरेश चव्हाणके यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रबोधन मंचचे सुनील वांकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, संग्रामसिंह निकम, सुनील वाडकर, गजानन तोडकर, दीपक देसाई, उदय भोसले, प्रसन्न शिंदे, सूरज लोहार, नंदकुमार दिवटे, गंगाराम येडगे, निरंजन शिंदे, राजू तोरस्कर, विकास जाधव यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.