गड-डॉजबॉल यश

गड-डॉजबॉल यश

Published on

25743
गडहिंग्लज : जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेतील जागृती हायस्कूलच्या विजेत्या मुलींच्या संघासोबत मार्गदर्शक शिक्षक.
.....
जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे
जागृती हायस्कूलला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : येथील जागृती हायस्कूलच्या मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली.
मुलींच्या विजेत्या संघात समृद्धी मोदर, संचिता गोईलकर, श्रेया मगदूम, रसिका पवार, मधुरा मुसाई, निकिता गवळी, समीक्षा घालवाडकर, तेजस्विनी पोटजाळे, अक्षता देसाई, सायली रानगे यांचा समावेश आहे. मुलांच्या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. संघात नीलेश आढावकर, शार्दुल मोहिते, सिद्धार्थ माळवी, सक्षम लब्यागोळ, श्रीहरी मिसाळ, योगीराज पाटील प्रज्वल पन्हाळकर, सुशील कोळवणकर, श्रेयस मरगुद्री, पार्थ मोरे यांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव बाबूराव भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक विजय चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत, पर्यवेक्षक शिवाजी अनावरे यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा शिक्षक सचिन मगदूम, संपत सावंत, पी. बी. हरकारे, बाळासाहेब खरात, दयानंद ग्वाडी यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com