इचल : शालेय क्रिडा वृत्त

इचल : शालेय क्रिडा वृत्त

Published on

25757
इचलकरंजी ः राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील विजेत्या बालाजी हायस्कूलच्या खेळाडूंसह मार्गदर्शक शिक्षक.
......
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग
स्पर्धेत बालाजी हायस्कूलचे यश

इचलकरंजी, ता. १७ ः बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत बालाजी हायस्कूलच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण व तीन ब्राँझ पदकांची कमाई केली. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालय, पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने ही स्पर्धा पार पडली.
श्रेयश हेद्दुरे याने १९ वर्षांखालील ६७ किलो वजनी गटात स्नॅच १०५ व क्लीन अॅन्ड जर्क १३३ असे एकूण २३८ किलो वजन उचलून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. एजाज मोमीन याने १०९ किलो वजनी गटात स्नॅच ८३ व क्लीन अॅन्ड जर्क १०७ किलो असे एकूण १९० किलो वजन उचलून राज्यात विजेतेपद पटकावले. दोघांनाही सुवर्णपदक प्राप्त झाले.
प्रीती दुरुगडे हिने ४९ किलो वजनी गटात ४० व ५३ असे एकूण ९३ किलो वजन उचलले. तुळसीदास मेंगाणे याने ९६ किलो वजनी गटात ७५ व ९० असे १६५ किलो वजन उचलले. प्रथमेश चव्हाणने ६७ किलो वजनी गटात १०२ व १२५ असे २२७ किलो वजन उचलले. या तिघांचाही तिसरा क्रमांक आला. त्यांना ब्राँझ पदक मिळाले. यातील श्रेयश हेद्दुर व एजाज मोमीन यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक उत्तम मेंगणे, विभागप्रमुख राजेश चौगुले, रवी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिक एम. एस. रावळ, उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com