जंगल देई रोजगार

जंगल देई रोजगार
Published on

लोगो
जंगल देई रोजगार ः भाग ३

गिर्यारोहण प्रशिक्षणाला वाव, वधारेल पर्यटनाचा भाव
नियम, अटीच्या अधीन राहून मिळावी मान्यता; विविध संस्थांचीही तयारी

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १७ ः हिमालयाचे अनुपम सौंदर्य पाहायला कोल्हापुरातून लोक जातात तसे उत्तर भारतातून पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक हौसेने येथे येतात; मात्र दोन्हींकडे डोंगर- दऱ्या आहेत. कोल्हापुरात डोंगर दऱ्यांना घनदाट जंगल वैभवाची जोड आहे. गिर्यारोहण शिकण्यासाठीचा भाग अनुकूल आहे. त्यामुळे गिर्यारोहणाच्या प्राथमिक शिक्षणासाठी मोठी संधी आहे. शासनस्तरावरून गिर्यारोहण प्रशिक्षणाला बळ दिल्यास चांगले गिर्यारोहक तयार होतीलच. शिवाय पर्यटन व रोजगार वाढीस मदत होणार आहे.
कोल्हापुरातील जवळपास २० ते २५ गिर्यारोहकांनी हिमालयातील उंच कडा सर करत देशातील अव्वल गिर्यारोहकांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. यात खुशी कांबोज, कस्तुरी सावेकर या मुलींनी गिर्यारोणात राष्‍ट्रीयस्तरावर कोल्हापूरचा लौकीक वाढवला. गिर्यारोहक व त्यांच्या बहुतांश मोहिमा हिमालयात होतात. तशा प्रशिक्षण संस्थाही तेथे आहेत.
कोल्हापूरसह राज्यात देशात गिर्यारोहणाची रुची असलेला वर्ग आहे. काही शाळा, पोलिस, सैन्य भरती प्रशिक्षण अकादमी असो अथवा साहसी क्रीडा संस्था, गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देतात. मात्र, गिर्यारोहणाची केवळ इच्छा आहे. म्हणून थेट हिमालय सर करण्यास जाणे उचित नाही. तत्पूर्वी छोटे डोंगर कड्यातून गिर्यारोहण प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी काही प्रशिक्षण शिबिरे होतात. त्यासाठी कोल्हापुरातील चंदगड, भुदरगड, आंबोली, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा आदी ठिकाणातील डोंगर दऱ्यात मोजक्या ठिकाणी अशी प्रशिक्षण केंद्र किंवा साहसा क्रीडा संस्थांना शासनाने मान्यता देणे, त्यासाठी जंगल संरक्षणाच्या दृष्टीने अटी घालणे महत्त्वाचे आहे.
पदभ्रमंतीसाठी येथे २०० ते दोन हजार जणांचे गट येतात. जंगल वाट चालतात, जंगल संरक्षणाचे प्रश्न उपस्थित होतात. मात्र, जंगलाची कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेऊन अनुभवी गिर्यारोहक व संस्थांनी प्रशिक्षण करणे शक्य आहे. त्यासाठी ठराविक भागाची निवड कराता येईल. नियम, अटीच्या अधीन राहून गिर्यारोहण संस्थांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्यास देशभरातील इच्छुक गिर्यारोहकांची पिढी येथे तयार होण्यास मदत होणार आहे.

हे शक्य
-देशाच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांसाठी दहा-बारा दिवसांचे शिबिर
-गिर्यारोहण संस्था व शासनाचा महसूल वाढेल
-निवास भोजन, नाश्ता व्यवसायाला गती लाभेल
-स्थानिक गिर्यारोहक मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळेल
-जंगलांची माहिती देणारे गाईड तयार होतील.
-पर्यटकांची संख्या व मुक्काम वाढेल

कोट
गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण सुविधा देण्यासाठी इच्छुक आहेत. काही तांत्रिक बाबी व शासनस्तरावरील मान्यतेचे प्रश्न आहेत. खबरदारी घेऊन गिर्यारोहण प्रशिक्षण दिल्यास प्रतिसाद चांगला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
-विनोद कांबोज, गिर्यारोहक मार्गदर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com