उजळाईवाडी येथे दीपोत्सव उत्साहात
25978
उजळाईवाडी : येथील श्री उजळाईदेवी मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाला.
उजळाईवाडी येथे दीपोत्सव उत्साहात
उजळाईवाडी : येथील उजळाईदेवी मंदिरात नवदुर्गा महिला मंडळ व श्री श्री ज्ञानविकास केंद्र यांच्यातर्फे दीपोत्सवाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्री ज्ञानविकास केंद्राचे मुकुंद बगाडे यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या, केंद्रातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दीपोत्सवाने मंदिर परिसर उजळून निघाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंदिराचे पुजारी अशोक गुरव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

