विरोधकांच्या टीकेला जनताच उत्तर देईल
लोगो ः हातकणंगले मतदारसंघ
..................
25923
अंबप (ता. हातकणंगले) ः येथील प्रचार फेरीत बोलताना आमदार राजू आवळे. शेजारी मान्यवर.
............
विरोधकांच्या टीकेला जनताच उत्तर देईल
राजू आवळे : विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने वैयक्तिक टीका
घुणकी, ता. १७ : ‘गेल्या दहा दिवसांतील प्रचार पाहता विरोधकांनी हातकणंगले तालुक्यातील विकासकामांवर न बोलता केवळ माझ्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली. या टीकेला हातकणंगलेची जनता मतदानातून योग्य ते उत्तर देईल,’ असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राजू आवळे यांनी व्यक्त केला. अंबप (ता. हातकणंगले) येथे प्रचार दौरा झाल्यानंतर ते बोलत होते.
आवळे म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले होते की, आपल्याला ही निवडणूक विकासकामांच्या मुद्द्यावर लढवायची आहे. माझ्या विरोधात जिल्ह्यातील मोठे नेते हातकणंगले मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीकाटिप्पणी न करता आपण केलेले काम सांगत जनतेसमोर जायचे आहे. त्याप्रमाणे पूर्ण प्रचारकाळात कोणत्याही नेत्यावर वा गटावर टीका केली नाही. माझ्यावर झालेल्या टीकेकडे मी दुर्लक्ष करत माझी भूमिका मांडत राहिलो. माझे काम हेच माझे भांडवल आहे. टीकेकडे फारसे लक्ष न देता पाच वर्षांत काय काम केले, भविष्यात काय करणार, हेच सांगत राहिलो. वैयक्तिक टीका करणे, हा माझा स्वभाव नाही. विरोधकांशीही माझे सौजन्यपूर्ण संबंध आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘हातकणंगलेची जनता स्वाभिमानी आणि जागरूक आहे. त्यांना कोण कामाचा, कोण कोणाची कटपुतली आहे, याची चांगल्याप्रकारे जाण आहे. विरोधकांच्या वैयक्तिक टीकेला जनताच मतदानातून जोरदार प्रत्युउत्तर देईल. महाविकास आघाडीने सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना महिन्याला तीन हजार रुपये, महिला-मुलींना मोफत एसटी बस प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी, बेरोजगार युवकांना महिना चार हजार रुपये देण्याची गॅरंटी दिली आहे. ती नक्की पूर्ण होतील.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

