भाषा नेमकी आहे कुठे
जगण्याला
भाषेचे बळ
भाग १
..............
मालिका लीड
मराठी, हिंदी आणि इंग्रजीबरोबरच इतर भाषाही आता संशोधनाबरोबरच करिअरसाठीही महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत. माणसाच्या जगण्याला बळ देणाऱ्या या विविध भाषांची जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेणारी मालिका आजपासून...
...................
संस्कृतला पुन्हा येणार सोन्याचे दिवस
वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधनात वाढला वापर
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः एकीकडे उपग्रहावर संदेश पाठविण्यासाठी संस्कृत भाषेचा उपयोग होतो. आयुर्वेदाचे शिक्षण घेताना संस्कृत भाषा अनिवार्य आहे, तर अभियांत्रिकीमधील काही अवघड संकल्पना संस्कृतमध्येच उपलब्ध आहेत. संस्कृत ग्रंथातील ज्ञानाचा वापर उपयुक्त असूनही कागदातच दडला गेला आहे. मात्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधनातील संस्कृतच्या वाढत्या वापराने या भाषेला पुन्हा सोन्याचे दिवस येणार आहेत.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १९८४ मध्ये संस्कृत विषय माध्यमिक स्तरावर शिकविण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षाने याची अंमलबजावणी झाली. सातवी ते आठवी या दोन वर्गांमध्ये संस्कृत विषय ऐच्छिक म्हणून शिकवला जाऊ लागला. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिकवला जाऊ लागला. शिक्षकही एका शाळेत या विषयासाठी दोन-तीन शिक्षक उपलब्ध होते. सातवीनंतर दहावीचा अभ्यासक्रम म्हणून संस्कृत विषय पुढे शिकणे थांबले. तिथूनच संस्कृतची केवळ ओळख करून घेऊन संस्कृत भाषा संपूर्ण अर्थाने शिकण्याला विद्यार्थ्यांकडून दुर्लक्ष केले जाऊ लागले. कॉलेजमध्ये संस्कृतचा फारसा संबंध येत नाही. संस्कृत शिकून पुढे काय करणार, या विचारातून संस्कृत विषय शिकणे आणि शिकवणे नगण्य झाले.
जागतिकीकरणानंतर विदेशी कंपन्या भारतात आल्या. इंग्रजी शाळांचे पेव फुटले. इंग्रजीच्या नादात संस्कृत विसरले गेले. वेदकाळापासून रामायण, महाभारतापर्यंत आणि चरकसंहितेपासून चाणक्यनीतीपर्यंत अनेक ग्रंथांतून रोजच्या जगण्यातील ज्ञान संस्कृत श्लोकातून मिळते, असे संस्कृतच्या काही अभ्यासकांनी सिद्ध करून दाखवले. त्यानंतर काही संशोधक संस्कृत भाषेतील पुरातन ग्रंथांतून कोणते ज्ञान मिळणार, याबाबत उत्सुक आहेत. मात्र, त्यांना संस्कृत शिकवणारे नाहीत. सध्याही जिल्ह्यातील काही शाळांमध्ये संस्कृत विषय शिकवला जातो. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे. मात्र, या विषयाला एकच शिक्षक यामुळे अध्यापनाला मर्यादा येतात. भविष्यातही हे शिक्षक निवृत्त झाल्यानंतर या भाषेतील शिक्षकांची गरज पडणार आहे.
--------
चौकट
‘बीएएमएस’ला संस्कृत शिकणे अनिवार्य
भारतीय आयुर्वेदाविषयी प्रगत राष्ट्रांनाही कुतूहल आहे. मात्र, आयुर्वेदातील संज्ञा या संस्कृतमध्ये आहेत. विदेशी संशोधक भारतीय संस्कृतचा अभ्यास करून आयुर्वेदामध्ये संशोधन करत आहेत. बीएएमएस हे वैद्यकीय शिक्षण घेताना संस्कृत भाषा शिकणे अनिवार्य आहे. स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी संस्कृत भाषेचे शिक्षण घेणे मोलाचे ठरते आहे.
---------
कोट
‘नासा’मध्ये नोकरी करण्यासाठी संस्कृत भाषा येणे अनिवार्य आहे. उपग्रहावर संदेश पाठविण्यासाठी संस्कृतचा वापर होतो. आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण घेताना संस्कृत अनिवार्य आहे. तसेच संस्कृतमुळे उच्चार स्पष्ट होतात, वाणी शुद्ध होते, वागण्या- बोलण्यात फरक पडतो. या सर्व बाबींमुळे सध्या पालक विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्यास प्रोत्साहन देत आहेत. शिक्षकांचीच कमतरता भासते आहे.
- सुनंदा पाटील, संस्कृत शिक्षिका, उषाराजे हायस्कूल
-----
दृष्टिक्षेपात...
संस्कृतचे शिक्षक ः सुमारे २००
विद्यार्थी ः सुमारे ६०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

