मतदानासाठी योजना कर्मचारी

मतदानासाठी योजना कर्मचारी

Published on

निवडणूक भत्ता देण्यास टाळटाळ, विलंब नको
-
श्रमिक संघाचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

कोल्हापूर, ता. १९ ः ‘विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देण्यात येतो. मात्र, याआधीच्या अनुभवानुसार आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांना भत्ता देण्यास टाळाटाळ किंवा विलंब होतो. असा विलंब यंदा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात,’ अशा मागणीचे पत्र श्रमिक संघाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.
विधानसभा मतदान केंद्रावर पाळणाघर, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, तसेच वैद्यकीय प्रथमोपचार व रुग्णवाहिका आदी सुविधा केल्या आहेत. मतदारांना या सुविधांचा लाभ गरजेनुसार देण्यात येणार आहे. त्यासाठी पाळणाघरावर अंगणवाडी सेविका, तसेच वैद्यकीय उपचार व अन्य मतदानपूरक कामांसाठी आशा कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३५० व २५० रुपये असा भत्ता देण्यात येतो. गेल्या निवडणुकीवेळी काही केंद्रांवर योजना कर्मचाऱ्यांना दिवसभर काम करूनही भत्ता मिळालेला नव्हता. त्या वेळी तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला होता, तर काही मतदान केंद्रावर असा भत्ता तत्काळ देण्यात आला.
यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत सर्व कर्मचाऱ्यांचा भत्ता ‘ऑनलाईन’ त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यात आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविकांचे भत्ते मिळतील, अशी अपेक्षा आहे. तरीही श्रमिक संघाने योजना कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वरील मागणीचे पत्र दिले आहे, असे श्रमिक संघाचे नेते अतुल दिघे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com