सहकार सप्ताहानिमित्त कार्यक्रम

सहकार सप्ताहानिमित्त कार्यक्रम

Published on

प्रामाणिकपणा जपला तरच
सहकाराला गोड फळे ःडॉ. गुरव

‘दिलासा’मध्ये सहकार सप्ताहानिमित्त कार्यक्रम

कोल्हापूर, ता. १९ : ‘केवळ बँका, पतसंस्था, साखर कारखाने किंवा दूध संघाच्या प्रगतीसाठी नव्हे, तर व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनातही सहकार महत्त्वाचा आहे. पण, प्रामाणिकपणा असेल तरच सहकाराला गोड फळे येतात,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ वाणिज्य विभागप्रमुख डॉ. ए. एम. गुरव यांनी केले.
७१ व्या सहकार सप्ताहानिमित्त दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपसरव्यवस्थापक सत्यजित जगदाळे प्रमुख उपस्थित होते. मुक्त विद्यापीठाच्या ‘दिलासा’ अभ्यासकेंद्रात सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वितरण झाले.
डॉ. गुरव यांनी सहकारात यशस्वी होण्यासाठी स्वत:ची योग्य ओळख, नियोजन, इतरांशी स्वत:ची तुलना करत राहण्यापेक्षा आपले काम प्रामाणिकपणाने आणि तर्कशास्त्राचा योग्य उपयोग करून करत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा व अभ्यासकेंद्र प्रमुख प्रा. डॉ. रूपा शहा यांनी स्वागत केले. पूजा फुटाणे यांनी आभार मानले. भाग्यश्री निंबाळकर, सतीश पालकर, दीपक पाटील, प्रेमाताई पाटील, शीतल पाटील, आदींनी आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com