गोलपोस्ट उसना आणण्याची नामुष्की

गोलपोस्ट उसना आणण्याची नामुष्की
Published on

26360
कोल्हापूर ः संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलातील गोलपोस्ट असा वाकलेल्या स्थिती आहे.
..........
गोलपोस्ट उसना आणण्याची नामुष्की

विभागीय क्रीडा संकुलातील स्थिती ः क्रीडा विभागावर खेळाडूंचा संताप

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या येथील विभागीय क्रीडा संकुलातील फुटबॉल मैदानातील गोलपोस्ट वाकला आहे. तो बदलण्याऐवजी क्रीडा विभागाने राज्यस्तर, आंतरविभागीय विद्यापीठ स्पर्धेसाठी एका संस्थेकडून तात्पुरता उसना आणला आहे. क्रीडा विभागाच्या या कृतीबद्दल खेळाडूंमधून नाराजी व्यक्त होत आहे.
संभाजीनगर रेसकोर्स येथे विभागीय क्रीडा संकुलासाठी २००८ मध्ये तत्कालीन राज्य शासनाने कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा या पाच जिल्ह्यांसाठी पहिल्या टप्प्यात मंजूर २४ कोटीपैकी १७ कोटी रुपये खर्च केले. त्यात पहिल्या टप्प्यात धावनमार्ग, बास्केटबॉल, फुटबॉल मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव, टेनिस कोर्ट बांधले. त्यातील जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव गळतीमुळे अद्यापही पूर्ण होऊ शकलेला नाही, तर अन्य मैदाने पूर्ण झाली आहेत. त्याचा दर्जा कसाही असो, पण ती खेळासाठी उपयोगात येऊ लागली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून फुटबॉलचे मैदान क्रीडा क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहे. या फुटबॉल मैदानातील गोलपोस्टवरून पोलिस, सैन्य दलात जाऊ इच्छिणारी मुले-मुली गोळाफेक करतात. त्यामुळे कधी गोळा या गोलपोस्टवरून, तर कधी त्याच्या पाईपवरच पडतो. त्यामुळे हा गोलपोस्ट खराब झाला असून, तो वाकला आहे. त्या पोलच्या एका बाजूला दगड ठेवून तो घट्ट उभा केला आहे. अशा स्थितीतील गोलपोस्ट बदलण्याचे काम क्रीडा विभागाचे आहे; पण हा पोल काही बदलला जात नाही. अशाच परिस्थितीत या मैदानावर आठवड्यापूर्वी १९ वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठअंतर्गत आंतरविद्यापीठ स्पर्धाही पार पडली. या दोन स्पर्धासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी एका क्रीडा संघटनेला विनंती करून स्पर्धेपुरते उसने गोलपोस्ट मागवून बसविले होते. स्पर्धा झाली आणि पुन्हा वाकलेले पोल त्या जागी आले.
या वाकलेल्या स्थितीतील गोलपोस्टवर पावसाळ्यात चौदा, सतरा, एकोणीस वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धाही पार पडल्या आहेत. तरीसुद्धा हा पोल बदलण्याचे स्वारस्य काही केल्या क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी दाखवत नाहीत. मैदानावर खड्डे पडले आहेत. त्याचा खेळाडूंना त्रास होत असल्याचे दिसूनही शासकीय फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. मैदानात चिखल झाल्यानंतर अनेक खेळाडू जखमीही झाले आहेत. त्यात हा पोल वाकला आहे. त्यामुळे खेळाडूंकडून विभागाच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे.
.........................
कोट
पोलिस, सैन्यदलात जाऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींच्या गोळाफेक सरावामुळे फुटबॉल मैदानाचा गोलपोस्ट वाकून खराब झाला आहे. तो त्वरित बदलला जाईल.
- माणिक पाटील, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कोल्हापूर
...........
कोट...
कोट्यवधी रुपये खर्च करून धावनमार्ग, फुटबॉल मैदान, जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव बांधला आहे. त्यातील फुटबॉल मैदानाचा गोलपोस्ट गेल्या काही महिन्यांपासून वाकलेला आहे. तरीसुद्धा स्पर्धा घेतली जात आहे. खराब झालेला गोलपोस्ट बदलणे क्रीडा विभागाचे काम आहे. राज्यस्तरीय दर्जेदार स्पर्धा घेण्यासाठी अशी मैदाने उभारली आहेत. तरीसुद्धा अशी स्थिती होणे, अत्यंत संतापजनक आहे.
- विकास पाटील, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू व संघटक
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com