बंधाऱ्यांत पाणी अडविण्यास प्रारंभ

बंधाऱ्यांत पाणी अडविण्यास प्रारंभ

Published on

26361
ऐनापूर ः येथील बंधाऱ्यात बरगे टाकल्याने झालेला पाणीसाठा.
..............
बंधाऱ्यांत पाणी अडविण्यास प्रारंभ

आजऱ्यात पाटबंधारेकडून नियोजन ः रब्बीसह उन्हाळी पिकांना फायदा

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १९ ः आजरा तालुक्यात पाटबंधारे विभागामार्फत पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. बंधाऱ्यांमध्ये बरगे घातले जात आहे़त. येत्या दहा-पंधरा दिवसांत तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांना बरगे घातले जाणार आहेत. त्याचा रब्बीसह उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे.
यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले. परतीचा आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे हिरण्यकेशी व चित्री नदीपात्रात पाण्याची पातळी चांगली राहिली. त्यामुळे नोव्हेंबरअखेरीस पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील घाटकरवाडी व सुळेरान. सर्फनाला प्रकल्पावर शेळप, दाभिल, देवर्डे, पारेवाडी, साळगाव, सोहाळे, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, ऐनापूर बंधारे आहेत. त्याचबरोबर चित्री नदीवर परोली बंधारा आहे. या बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येणार आहे. अडविलेल्या पाण्याचा उपयोग रब्बी, उन्हाळी पिकांना होणार आहे.
....
चौकट..
बंधाऱ्यात अडकलेली लाकडे हटवली
पावसाळ्यात पाण्याबरोबर नदीपात्रातून वाहून येऊन बंधाऱ्यात अडकलेली लाकडे पाटबंधारे विभागाने जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यास सुरवात केली आहे. बंधाऱ्याची स्वच्छता करून बरगे टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com