टाकाळा चौकातील गळती

टाकाळा चौकातील गळती

Published on

टाकाळा चौकातील
गळतीची अखेर दुरुस्ती,

अनेक वर्षांचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता
कोल्हापूर, ता. १९ ः टाकाळा येथील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गळतीचे मूळ शोधण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले. मुख्य जलवाहिनीवर असलेली गळती दुरुस्त करण्यात आली आहे. हीच एकमेव गळती असल्यास वाहून जाणारे पाणी वाचणार असून तेथील रस्ताही व्यवस्थित राहणार आहे.
टाकाळा चौकातून भारत हौसिंग सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी गळतीचे पाणी बाहेर पडत होते. त्यामुळे रस्ता खराब तर होतच होता. तसेच कावळा नाका टाकीकडे जाणारे पाणी योग्य दाबाने जात नव्हते. पाणीपुरवठा विभागाने भारत हौसिंग सोसायटीकडे जाणाऱ्या अनेक जलवाहिनी तपासल्या होत्या; पण मूळ गळती सापडत नव्हती. इतर सर्व दुरुस्ती केल्यानंतरही पाणी बाहेर पडत असल्याने टाकाळा चौकात जलवाहिनी तपासण्याचे ठरवले. पुईखडीकडून येणारी जलवाहिनी सायबरकडून टाकाळा चौकमार्गे कावळा नाका टाकीकडे जात होती. त्या वाहिनीचा शोध घेत चौकापर्यंत खोदाई करण्यात आली. त्यावेळी त्या चौकात पूर्वीची गळती रोखण्यासाठी टाकलेल्या काँक्रिट ब्लॉकखालून पाणी बाहेर पडत होते. ते पाणी रस्त्याखालून उताराने वाहून जाऊन ठिकठिकाणी बाहेर पडत होते. त्यामुळे तेथील रस्ता खराब झाला होता.
पाणीपुरवठा विभागाने आज तेथील गळती दुरुस्त केली. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळपासून तेथून पाणीपुरवठा सुरू झाला. या गळतीची दुरुस्ती झाल्यानंतर आणखी कुठून पाणी बाहेर पडत आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. हीच एकमेव गळती असल्यास तेथील प्रश्‍न निकाली निघणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com