‘सागरमाळ’ कडून ‘शाहूपुरी जिमखाना’ पराभूत

‘सागरमाळ’ कडून ‘शाहूपुरी जिमखाना’ पराभूत

Published on

‘सागरमाळ’ कडून ‘शाहूपुरी जिमखाना’ पराभूत

मुरलीधर सोमाणी चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित स्वर्गीय मुरलीधर सोमाणी चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सागरमाळ क्रिकेट असोसिएशनने शाहूपुरी जिमखाना संघाचा पहिल्या डावाच्या अधिक्यावर पराभव केला.
शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर झालेल्या दोनदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शाहूपुरी जिमखानाने पहिल्या डावात ४४ षटके आणि ५ चेंडूंत १८१ धावा केल्या. यात शुभम पाटीलने ३७, प्रीतेश जाधवने नाबाद ३२, ज्ञानेश ककडेने ३०, शौर्य खोडवेने २७ धावा केल्या. सागरमाळकडून रोहन ढाकणेने चार, अब्दुलमतीन शेखने दोन, रुद्र लोंढे, संदीप मन्ना, दिबेंदू पोरे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळतान सागरमाळ संघाने पहिल्या डावात ५० षटके आणि ४ चेंडूंत सर्वबाद १८२ धावा केल्या. यात निमिष आनंदेने ३५, रुद्र लोंढेने ३४, कृष्णा रजपूतने २५, रोहित मकवानाने २०, संदीप मन्नाने १६ धावा केल्या.
शाहूपुरीकडून प्रीतेश जाधवने सहा, तर अंश जसवाणीने दोन बळी घेतले. शाहूपुरीकडून दुसऱ्या डावात दिवसअखेर २२ षटके आणि तीन चेंडूंत ३ बाद ११९ धावा केल्या. यात सुमेध देसाईने ५२, ज्ञानेश काकडेने ४४ धावा केल्या. सागरमाळकडून दुसऱ्या डावात अब्दुलमतीन शेख, रूद्र लोंढे, रोहित मकवाना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दिवसअखेर सामना थांबला तेव्हा पहिल्या डावाच्या अधिक्यावर सागरमाळने बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com