जोतिबा मंदिर
येथील जोतिबा मंदिर परिसरात असणाऱ्या श्री काळभैरव देवाची जयंती शनिवारी (ता.२३) साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन काळभैरव खंडकरी मंडळ यांनी केले आहे.
शनिवारी सकाळी मंदिरात पाद्यपूजा, काकडआरती अभिषेक सोहळा होईल. त्यानंतर सकाळी दहा वाजता काळभैरव जयंतीनिमित्त होमहवन पुण्याहवाचन मातृकापूजन, वास्तुपीठ पुजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी काळभैरव देवाची बटू रुपातील तर जोतिबा देवाची कवच कुंडल रुपातील विशेष महापूजा बांधण्यात येणार आहे. चार वाजता गजानन डवरी, मच्छींद्र डवरी विश्वनाथ डवरी यांची डवरी गीते होतील. सायंकाळी सहा वाजता चांगभलच्या जयघोषात मंदिर परिसरात श्री. काळभैरव जन्मकाळ सोहळा होईल. गुलाल खोबऱ्याची उधळण व पुष्पवृष्ठी करण्यात येईल. आतिषबाजी करण्यात येणार आहे . त्यानंतर उपस्थित भाविकांना सुटंवडा होईल. रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .जयंती सोहळा पार पाडण्यासाठी काळभैरव खंडकरी मंडळ परिश्रम घेत आहेत . उद्या दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.