

इचलकरंजी
- पंडित कोंडेकर
हिंदुत्ववादी मतांमुळे आवाडेंचा विजय सोपा
इचलकरंजीत भाजप महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे हे जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्यांनी विजयी झाले. हिंदुत्ववादी एकगठ्ठा मते पडल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. शहरात मजबूत बांधणी असलेल्या भाजपची उमेदवारीही त्यांना फायद्याची ठरली. विरोधी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारात प्रभावी ठरलेला मराठा फॅक्टर यशस्वी झाला नाही. लाडक्या बहिणींची मते राहुल आवाडे यांच्या झोळीत पडली. राहुल आवाडे यांच्यावर केलेला घराणेशाहीचा आरोप मतदारांनी निष्प्रभ ठरविला.
-----
काही महिन्यांपूर्वीच आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तथापि, पाच वर्षे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. महायुती शासनाच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी विविध विकासकामांचा धडाका लावला होता. त्याचा आवाडे यांना फायदा झाला. तर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश हाळवणकर हे पक्षादेश मान्य करीत ताकदीने राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे भाजपची हक्काची मते आवाडे यांना मिळाली.
आवाडे यांच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दोन मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी दिग्गजांची फौज उतरली होती. त्याचाही वातावरण निर्मितीसाठी फायदा झाला. शहरामध्ये हिंदुत्ववादी एकगठ्ठा मते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे आवाडे यांच्या पारड्यात पडली. आवाडे यांचे सहकारी संस्थात्मक जाळे आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे मतांचा मोठा गठ्ठा आहे. या हमखास मतामुळे त्यांना मताधिक्य मिळण्यास मदत झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मदन कारंडे यांनी प्रचारात मराठा कार्ड बाहेर काढले. त्यामुळे कारंडे यांची हवा निर्माण झाली होती. अल्पसंख्याक समुदायाची हक्काची मते त्यांना पडतील, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र फारसे मतदान वाढले नाही. त्याचा फटका कारंडे यांना बसला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेनेसह अन्य पक्षांचा फारसा प्रभाव दिसला नाही. परिणामी, कारंडे यांना प्रचारात काही अंशी चुरस निर्माण करण्यात यश आले. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षित मते मिळाली नाहीत.
घडले काय?
१) भाजप उमेदवारीचा राहुल आवाडे यांना फायदा
२) आवाडे-हाळवणकर मनोमिलन यशस्वी
३) लाडकी बहिणींची मते आवाडे यांच्या पारड्यात
४) मदन कारंडे यांचा मराठा फॅक्टर अपयशी
५) घराणेशाहीचा मुद्दा मतदारांकडून निष्प्रभ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.