

गडहिंग्लजला आजपासून
स्फूर्ती क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : आजरा, चंडगड आणि गडहिंग्लज तालुक्यांतील सीबीएसई प्रशालांचा स्फूर्ती क्रीडा महोत्सवाला उद्या (ता. २५) पासून प्रारंभ होत आहे. मैदानी खेळांसह एकूण १२ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. येथील न्यू होरायझन स्कूलने क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. एकूण ३०० खेळाडू महोत्सवात सहभागी होणार आहेत. क्रीडा महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्षे आहे.
गडहिंग्लज उपविभागातील सीबीएसई प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गतवर्षीपासून या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. अॅथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल या मैदानी खेळांसह कॅरम, बुद्धिबळ, रांगोळी अशा १२ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. सकाळच्या सत्रात अॅथलेटिक्स, तर दुपारच्या सत्रात इतर स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी मैदानाच्या आखणीसह इतर तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी आठ वाजता तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. सायंकाळी पाच वाजता विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. होरायझनच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील, क्रीडा विभागप्रमुख अनिल चौगुले विशेष परिश्रम घेत आहेत.
......
चौकट...
कामगिरीची उत्कंठा
गतवर्षी न्यू होरायझनने स्पर्धेवर वर्चस्व गाजविले होते. यंदाही यजमान असल्याने चांगली तयारी केली आहे. सीबीएसई विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर होरायझनचा व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्समध्ये वरचष्मा आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर होरायझनचे खेळाडू हुकूमत गाजवतील अशी आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.