पर्यटन हंगाम सुरू

पर्यटन हंगाम सुरू
Published on

फोटो 27475
-
शहरात बहरला पर्यटनाचा हंगाम
शाळांच्या सहली सुरू; सहकुटुंब, मित्रांसोबत येणाऱ्यांचीही गर्दी

कोल्हापूर, ता. २४ : थंडी सुरू झाली असून, निवडणुकाही संपल्याने आता येथील पर्यटन हंगाम बहरू लागला आहे. शाळांच्या सहलींबरोबर सहकुटुंब पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांमुळे शहर गजबजू लागले आहे. आज अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेस, जोतिबा-पन्हाळ्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती.
निवडणुकीच्या धामधुमीमुळे दोन आठवड्याच्या कालावधीत शहर परिसरात गर्दी कमी जाणवत होती. पण, मतदान होऊन मतमोजणी शनिवारी झाल्यानंतर अनेकजण निवांत झाले आहेत. त्यामुळे शनिवार, रविवारचा दिवस साधत पर्यटनासाठी आलेल्यांची संख्या वाढली होती. काल रात्रीपासून शहरात विविध भागांतील वाहने दाखल झाली होती. यात्री निवास, हॉटेलचा परिसर वाहनांनी भरून गेला होता. आज सकाळी लवकर अंबाबाई दर्शनासाठी पर्यटक बाहेर पडले होते. दुपारनंतर पर्यटकांची गर्दी आणखी वाढली. छत्रपती शिवाजी स्टेडियम, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, दसरा चौक, मिरजकर तिकटी, ताराबाई रोड, रंकाळा येथे या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात सहकुटुंब येणाऱ्यांबरोबर, मित्रांबरोबर येणाऱ्यांचीही संख्या मोठी होती. बिंदू चौकातील तटबंदीजवळ वाहनांसाठी प्रतीक्षा करत उभे असलेले पर्यटक दिसत होते. तसेच तटबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सेल्फी घेणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय होती.
याबरोबरच आता थंडीचे वातावरण सुरू झाले असल्याने विविध भागांतील शाळांच्या सहलीही येऊ लागल्या आहेत. एसटी बसमधून उतरून मंदिर परिसरात तसेच रंकाळ्यावर फिरणारे शालेय विद्यार्थी दिसू लागले आहेत. पुढील आठवड्यासह पुढील महिन्यातही पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यादृष्टीने पार्किंगचे नियोजन करण्याची गरज भासत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com