एडस्‌ दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

एडस्‌ दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
Published on

एचआयव्ही संसर्गितांना उपचारासाठी प्रोत्साहन देणार
डॉ. सुप्रिया देशमुख : जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर, ता. २९ : मुंबई, पुणे पाठोपाठ सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीसह जगणाऱ्यांची संख्या अधिक असून, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम, समुपदेशन, चाचणी आणि औषधोपचाराद्वारे ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एक डिसेंबर जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली.

‘मार्ग हक्काचा, सन्मानाचा’, ही यावर्षी संकल्पना असून एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांच्या अधिकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या बाबतीतील कलंक, भेदभाव दूर करणे, योग्य उपचारासाठी दिशा मिळवून देणे हा उद्देश असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी सांगितले. २०३० पर्यंत एड्स संपविण्याचे उद्दिष्ट असून, शासनाच्या वतीने त्या दृष्टीने एड्स नियंत्रणाच्या पाचव्या टप्प्यांमध्ये नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये २००७ पासून ते आजअखेर २४८६८ एचआयव्ही संसर्गित रुग्णांची प्री एआरटीसाठी नोंद झाली असून, पैकी १३३४५ रुग्ण एआरटी औषध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, महापालिका दवाखाने येथे एचआयव्ही समुपदेशन आणि चाचणीसाठी आयसीटीसी केंद्र कार्यान्वित असून, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत एचआयव्ही तपासणीची सुविधा आहे. वर्षभरात एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात ‘इंडेक्स टेस्टिंग अभियान’ राबविले आहे.
यावर्षी प्रभात फेरी, पथनाट्य फ्लॅश मॉब, जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, जोखमीच्या गटांचे संवेदीकरण, चित्रकला आणि सोशल मीडिया पोस्ट स्पर्धांचे तसेच एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी वधू-वर मेळावा कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com