

विना रिफ्लेक्टर ऊस
वाहनांवर कारवाई करा
गडहिंग्लज, ता. ३ ः सध्या उसाचा हंगाम सुरू झाला आहे. संकेश्वर, हरळी, चंदगड, चिकोडी, बेलेवाडी कारखान्याला ऊस घेऊन वाहने जात आहेत. परंतु काही वाहने रिफ्लेक्टर न लावताच जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यासाठी अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे.
गावच्या वेशीवर, चौकात तसेत महत्वाच्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात गर्दी असते. ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची सक्ती परिवहन विभागाने केली आहे. परंतु काही वाहनांच्या मागे रिफ्लेक्टरच नसते. परिणामी रात्रीच्यावेळी ऊस वाहतूकीला अपघाताचा धोका वाढला आहे. परिवहन विभागाच्या आदेशाला बहुतांशी वाहनधारक केराची टोपली दाखवित असून अशा वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे. गडहिंग्लज पोलिसांनी रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करून अशी वाहने आढळल्यास कारवाई करावी अशी मागणी आहे. श्रीशैलाप्पा साखरे, सागर हेब्बाळे, सुमित कोरवी, तेजस घेवडे, किशोर चौगुले, राहूल नेसरीकर, संदीप केसरकर, उदय गोरूले, प्रकाश पाटील, विशाल चव्हाण, लक्ष्मण पाच्छापुरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.