घरफोडीप्रकरणी डॉक्टरसह टोळीला अटक

घरफोडीप्रकरणी डॉक्टरसह टोळीला अटक
Published on

२९११५ ः
अनुक्रमे - हरीश पोळ, स्वप्नील सातपुते, गुरुदत्त पोळ, डॉ. संजय पोळ
कोल्हापूर ः टोळीकडून जप्त केलेले दागिने.
-----------
घरफोडीप्रकरणी डॉक्टरसह टोळीला अटक
इस्पुर्ली, मिरजेतील घरफोड्या उघड; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः कर्जबाजारीपणामुळे साथीदारांच्या मदतीने घरफोड्या करणाऱ्या डॉक्टरसह टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. डॉ. संजय मधुकर पोळ (वय ४७, रा. दिंडी वेस, मिरज), गुरुदत्त शांतिनाथ पोळ (४३), हरीश मधुकर पोळ (३८, दोघे रा. जवाहरनगर), स्वप्नील सुरेश सातपुते (३९, रा. यादवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
इस्पुर्ली व मिरजेत या टोळीने केलेल्या घरफोड्यांतील तीन तोळे सोने, १९० ग्रॅम चांदी, मोटारसायकली असा साडेपाच लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या चौघांनी जिल्ह्यात अन्य काही ठिकाणीही चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. गांजा विक्री, चोरीसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल असलेला गुरुदत्त पोळ संशयित चोरीचे दागिने विकण्यासाठी कळंबा परिसरात येणार असल्याची माहिती अंमलदार खंडेराव कोळी व नवनाथ कदम यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना हा तपशील दिला. त्यांनी दोन वेगवेगळी पथके कळंबा, कात्यायनी मंदिर परिसरात तैनात केली होती. शनिवारी रात्री चारही संशयितांना कात्यायनी मंदिर परिसरात पकडण्यात आले.
चारही संशयितांना पकडून त्यांची झडती घेतली असता चोरीचे दागिने त्यांच्याजवळ मिळून आले. घरफोडी करण्यासाठीची कटावणी व इतर साहित्य जप्त केले. दोन मोटारसायकलींसह पाच लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अट्टल चोरटे
पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरुदत्त पोळ याला घरफोडीच्या गुन्हात अटक झाली आहे. त्याच्यावर याआधी ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गांजा तस्करी, चोरीच्या गुन्ह्यात त्याला अनेकदा अटकही झाली होती. त्याचा साथीदार स्वप्नील पोळ याच्यावरही २२ गुन्हे दाखल आहेत. दोघांनाही घरफोडीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले.

कर्जबाजारी डॉक्टर बनला घरफोड्या..
संशयित डॉ. संजय पोळ मूळचा जवाहरनगरातील असला तरी तो मिरजेत दवाखाना चालवित होता. हातउसने, सावकारी कर्जांमुळे त्याला दवाखाना बंद करण्याची वेळ आली. मागील सहा महिने त्याचा दवाखाना बंद होता. तो कोल्हापुरातील गुरू पोळ, स्वप्नील पोळसोबत घरफोडीसारखे गुन्हे करत असल्याचे समोर आले. या टोळीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com