

फोटो 30047
................
‘खंडोबा’च्या नावानं चांगभलं...
चंपाषष्ठी उत्सवातील उत्साह टीपेला, आज खोलखंडोबाचा पालखी सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, ‘यळकोट...यळकोट...जय मल्हार’ असा अखंड जयघोष आणि त्याच्या जोडीला धनगरी ढोल, हलगी, पी-डबाक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजर असा अलोट उत्साह आज रात्री पाहायला मिळाला. निमित्त होते शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय येथे चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबाच्या विवाह सोहळ्याचे. दरम्यान, उद्या (शनिवारी) शहरातील विविध खंडोबा मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिरात सायंकाळी पालखी सोहळा होणार आहे.
शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्र मंडळातर्फे रात्री खंडोबा देवाचा हळदी व विवाह सोहळा झाला. फटाक्यांची भव्य आतषबाजी व नेत्रदीपक विद्युतरोषणाईन परिसर उजळून निघाला. पारंपरिक वाद्यांच्या गजराने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दर्शनासाठीही रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान, सकाळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी खंडोबा देवालयात दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
यावेळी माजी महापौर विक्रम जरग, आनंदराव ठोंबरे, जयवंत चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मेढे, भीमराव साळोखे, अक्षय जरग, योगेश चौगले, प्रवीण जरग यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.