निधन वृत्त
30173
कॅप्टन भगवंतराव माने यांचे निधन
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील कॅप्टन भगवंतराव शंकरराव माने (वय ९०) यांचे निधन झाले. भारत-चीन, भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी योगदान दिले होते. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) सकाळी नऊ वाजता होईल. १९६९ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले. भारत-चीन, भारत-पाकिस्तान युद्धात केलेली कामगिरी आणि अनुभवामुळे त्यांना निवृत्तीनंतर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात देशसेवेकरीता पुन्हा सैन्यदलात बोलावले होते. या युद्धातील आर्टिलरी विभागात त्यांनी सेवा बजावली. कॅप्टन माने यांचा जन्म चिपरीत दोन डिसेंबर १९३४ रोजी जन्म झाला. त्यांनी बी.ए.च्या पदवीनंतर एलएलबी पदवी मिळवली. यानंतर ते सैन्यदलात दाखल झाले. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात ते सहभागी झाले होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातही आर्टिलरी विभागात कॅप्टन म्हणून योगदान दिले होते.
...
30140
हौसाबाई पाटील
कोल्हापूर : जैताळ (ता. करवीर) येथील हौसाबाई गणपती पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.
30154
लक्ष्मीबेन पटेल
कोल्हापूर : सरनाईक कॉलनी येथील लक्ष्मीबेन दामजी पटेल (लिंबानी) (वय ७७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.
30155
बाळासाहेब हिरुगडे
कोल्हापूर : शाहू नगर, दत्त गल्ली, राजारामपुरी येथील बाळासाहेब श्रीपती हिरुगडे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
30157
प्रकाश हांडे
कोल्हापूर : रंकाळवेश एस.टी. स्टॅन्डजवळील प्रकाश कृष्णा हांडे (वय ६६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.
30160
बाबूराव ढाले
कोल्हापूर : यादव नगर एमएसईबी ऑफिस शेजारी येथील बाबूराव ज्ञानू ढाले (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.
30170
आमीर शेख
कोल्हापूर : आमीर बाबासो शेख (वय २७) यांचे निधन झाले. जियारत विधी सोमवारी (ता. ९) बागल चौक कब्रस्थान येथे होईल.
30194
सुगंधा लोहार
कोल्हापूर ः टाकाळा येथील सुगंधा मोहन लोहार (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

