राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ‘१४’चा संघच नाही
शोधवृत्त लोगो घेणे
सकाळ इन्व्हिस्टिगेशन असा लोगो आहे, तो घ्यावा...
............
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ‘१४’चा संघच नाही
मूळ हेतूचा विसर ः प्रबोधिनीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील संघांना थेट प्रवेश मिळतो. तरीसुद्धा यंदा १४ वर्षांचा संघच या स्पर्धेत खेळविण्यात आला नाही. त्यामुळे एकूणच क्रीडा विभागातील क्रीडा प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीवर क्रीडाप्रेमींतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शालेय फुटबॉल स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या स्पर्धेला मोठे महत्त्व आहे. त्यात राज्यातील अनेक शाळांचे संघ जिल्हा, विभाग असे टप्पे पार करीत राज्य स्पर्धेपर्यंत पोहोचतात. मात्र, यात क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षण शास्त्रोक्त आणि दर्जेदार असते. एक वेगळी तरतूद म्हणून येथील १४, १७ आणि १९ वर्षांखालील संघांना राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो. मात्र, इतर संघांना अशी सवलत नाही. तरीसुद्धा गेल्या वर्षीपासून मुलांचे १४ वयातील पुरेसे प्रवेश नाहीत. या कारणावस्तव स्पर्धेत संघच उतरविला नाही. तर त्याच वयोगटातील काही खेळाडू सतरा१७, तर १७ वर्षांखालील उर्वरित खेळाडू १९ वर्षांखालील गटात खेळविल्याची चर्चा राज्याच्या फुटबॉल क्षेत्रात आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सर्वच खेळांत महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंनी आशियाई, राष्ट्रकुल, ऑलिंपिक आदी स्पर्धांमध्ये चमकावे. नव्हे तर तितकेच दर्जेदार खेळाडू राज्यात निर्माण व्हावेत, या उद्देशाने आठ ते १४ वयोगटातील मुला-मुलींची निवड करून त्यांना ८ ते १० वर्षे प्रशिक्षणाद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे हे क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख उद्दिष्ट ठरविले. त्यानुसार पुण्यातील बालेवाडीमध्ये मुख्य केंद्र आणि राज्यातील विविध जिल्ह्यांत निवासी केंद्र सुरू केले. गेली अनेक वर्षे या प्रबोधिनीतून अनिकेत जाधवसारखा युवा फिफा विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले. मात्र, कोरोनानंतर क्रीडा विभागाच्या या क्रीडा प्रबोधिनीचा कारभार काहीसा शिथिल झाला. आता तर गेल्या वर्षीपासून थेट राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत थेट प्रवेश असतानाही हा संघ उतरविला जात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रबोधिनीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
.............
प्रतिक्रिया...
राज्यातील शाळांच्या संघांना एक नियम आणि क्रीडा प्रबोधिनीच्या संघाला एक नियम असा दुजाभाव करू नये. पुढील वर्षी यात बदल करून जिल्हा, विभागस्तरावर क्रीडा प्रबोधिनीचे संघ खेळवावेत. इतर शाळांवर होणारा अन्याय क्रीडा विभागाने दूर करावा.
- सुयश साळोखे, फुटबॉल खेळाडू
....
प्रतिक्रिया...
काही वेळा ठराविक वयोगटातील खेळाडूंचा प्रवेश होत नाही. त्यामुळे उपलब्ध वयोगटातील मुलांच्या गटात राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेशित मुले खेळविली जातात. मुळात दर्जेदार खेळाडू घडविणे हा क्रीडा प्रबोधिनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- अरुण पाटील, क्रीडा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

