अटल टिंकरिंग लॅब
लोगो सकाळ इन्विस्टीगेशन
--------------
फोटो 30948
फोटो 30949
‘मेंटॉर’चा अभाव;
‘इनोव्हेशन’ची
धांबली धाव
अटल टिंकरिंग लॅबची स्थिती; शिक्षण विभागाला हवे शासनाचे पाठबळ
शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची दृष्टी लाभावी, त्यांना नवतंत्रज्ञानाचे धडे मिळावेत, या उद्देशाने केंद्र सरकारच्या नीती आयोगाने अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत देशभरात अटल टिंकरिंग लॅब सुरू केल्या. त्यात राज्यात सर्वाधिक १७५ लॅब कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांसाठी मंजूर झाल्या. येथील माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वर्षांत १२७ लॅब कार्यन्वित केल्या. शाळा, शिक्षण विभाग, शिक्षक आणि विद्यार्थी सकारात्मक असताना शासनाच्या पातळीवरून मात्र पुरेसे मेंटॉर (मार्गदर्शक) मिळत नसल्याने आणि तांत्रिक साहित्याच्या काही पुरवठादारांनी (व्हेंडर) गैरसमज निर्माण केल्याने उर्वरित ४८ लॅबमधील ‘इनोव्हेशन’ची गती रोखली आहे.
-संतोष मिठारी
पुरवठादारांनी गैरसमज निर्माण केल्याचा फटका
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील १७५ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब मंजूर झाल्या. त्यातील ८० टक्के शाळांना निधी देखील मिळाला. मात्र, या लॅबमधील तांत्रिक साधनांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने २०२१ पर्यंत काही शाळांत बंद आणि नावापुरत्या राहिल्या. त्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेत लैंड इन हँड (लाही) संस्थेशी सामंजस्य करार करून या शाळांमधील मुख्याध्यापक, तीन शिक्षक, तीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे पाऊल टाकले. त्यातून गेल्या दोन वर्षांत १२७ शाळांमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले. मात्र, या लॅबचे तांत्रिक साहित्य पुरवठा करणाऱ्या काही पुरवठादार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी काही शाळांमध्ये हे प्रशिक्षण उपयोगी नसल्याचा गैरसमज निर्माण केला. त्याचा फटका बसला आणि अजून ४८ शाळांमध्ये प्रशिक्षण झालेले नाही. त्यामुळे साहजिकच तेथील विद्यार्थ्यांमधील ‘इनोव्हेशन’ थांबले आहे.
एका शाळेतील लॅबसाठी २० लाखांचा खर्च
एका शाळेतील लॅबसाठी सरकारकडून २० लाख रुपये खर्च केले जातात. त्यात तांत्रिक साहित्य, समन्वयकाचे मानधन आणि किरकोळ खर्चासाठी बारा लाख रुपये पहिल्या टप्प्यात, तर पुढे चार वर्षांसाठी दरवर्षी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातात. या लॅबमध्ये रोबोटिक किटस, थ्रीडी प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर, मेकॅनिकल टूल्स, सेफ्टी इक्विमेंटस, तीन लॅपटॉप, आदी साहित्य असते. त्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिटिंग, ॲप आणि गेम डेव्हलपिंगबाबतचे शिक्षण दिले जाते. आतापर्यंत करवीर, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ, शाहूवाडी, राधानगरी, कागल, कोल्हापूर शहरातील शाळांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आजरा, चंदगड, गडहिंग्लज, आदी परिसरातील काही शाळांचे प्रशिक्षण प्रलंबित आहे.
राज्यात सर्वाधिक काम कोल्हापुरात
अटल टिंकरिंग लॅबमध्ये राज्यात सर्वाधिक नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये झाले आहे. त्यात विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवरील ४२८, तर जिल्हा पातळीवरील ८१ प्रकल्पांचा समावेश आहे. अटल इनोव्हेशन मिशनतर्फे राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या अटल मॅरथॉन २०२३-२४ स्पर्धेमध्ये टॉप- ५०० शाळांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शाळांची निवड झाली आहे. त्यात मलकापूर हायस्कूल (प्रोजेक्ट- स्मार्ट क्लोथ ड्राय सिस्टम), सरलादेवी यशवंतराव माने बॉइज अँड गर्ल्स हायस्कूल कागल (मल्टीपर्पज स्टँड), एस. पी. हायस्कूल, कुरुंदवाड (मल्टीपर्पज टेबल), वारणा विद्यानिकेतन आणि अण्णासाहेब पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स नवे पारगाव (मार्किंग सिस्टम), सिद्धनेर्ली विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज (फायर फायटिंग रोबोट) यांचा समावेश आहे.
चौकट
शाळांना मेंटॉर, साधनांच्या दुरुस्तीसाठी निधी हवा
या लॅबच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शिक्षकांनी स्थानिक समस्यांवर उपाययोजना शोधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. प्रकल्पांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे. तो कायम राहण्यासाठी जिल्ह्यातील शाळांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. सध्या या लॅबची जबाबदारी विज्ञान विषयाचे शिक्षक सांभाळतात. मात्र, इनोव्हेशनला गती द्यायची असल्यास शासनाने शाळांना स्वतंत्र मेंटॉर आणि लॅबमधील तांत्रिक साहित्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी किमान दहा हजार रुपयांचा निधी द्यावा. जिल्ह्यातील लॅब असणाऱ्या शाळांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांनी केली.
..........
कोट
गेल्या दोन वर्षांत पुणे येथील ‘लाही’ या संस्थेतर्फे जिल्ह्यातील १२७ शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना विनाःशुल्क प्रशिक्षण दिले आहे. उर्वरित शाळांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येईल. तालुका, जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. त्यातील दहा प्रकल्प राज्य, तर दोन प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. आपल्या जिल्ह्याच्या कामगिरीचे नीती आयोगाने पत्र पाठवून कौतुक केले आहे.
- डॉ. एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी
.........
कोट
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये आम्ही प्रशिक्षण दिले. तेथील अटल टिंकरिंग लॅबचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठीच्या उपक्रमात आम्ही सहभागी झाल्याचे वेगळे समाधान आहे.
- अरुंधती जाधव, एटीएल प्रकल्प समन्वयक, लाही संस्था
.........
नकाशा वापरावा
तालुकानिहाय लॅब
हातकणंगले : ३८
पन्हाळा : २३
करवीर : २२
कागल : १८
शिरोळ : १७
गडहिंग्लज : ११
राधानगरी : ९
शाहूवाडी : ८
चंदगड : ५
भुदरगड : ४
आजरा : ३
गगनबावडा : ३
कोल्हापूर महानगरपालिका : १४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

