प्रा. डॉ. रूपा शहा बातमी
फोटो 30946
निर्भयपणे काम करण्यासाठी ‘पॉश’
कायद्याची ओळख हवी ः डॉ. रूपा शहा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ हा केवळ शारीरिक किंवा शाब्दिक स्वरूपात नव्हे, तर मानसिक स्वरूपातही केला जाऊ शकतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी ‘पॉश’ कायद्याची सर्वांगीण ओळख महिलांनी करून घ्यावी, असे प्रा. डॉ. रूपा शहा यांनी सांगितले. सोमवारी टेलिकॉम महिला कल्याण मंडळाची कार्यशाळा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सांगली येथील लता पाटील होत्या.
महाराष्ट्र दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार टेलिकॉम सर्कलमध्ये टेलिकॉम महिला कल्याण मंडळांची स्थापना केली आहे. कोल्हापूर मंडलातील टेलिकॉम महिला कल्याण मंडळाचा पहिला कार्यक्रम म्हणून काल टेलिफोन भवन येथे ‘पॉश’ कायद्याविषयी कार्यशाळा झाली.
प्रा. डॉ. शहा म्हणाल्या, ‘कार्यालयात महिलांना निर्भयपणानं काम करता यावे, यासाठी महिलांनी कायद्याची जाण ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार एकमेकींना साथ द्यावी. महिलांनी सक्षम व निर्भय होण्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी.’
तंत्रज्ञ म्हणून कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती झालेल्या कमल पायमल यांचा सत्कार करण्यात आला. दिवंगत उपमहाप्रबंधक अनघा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली. पाहुण्यांची ओळख वीणा संकेश्वरी यांनी करून दिली. सूत्रसंचालन शोभा लवटे यांनी केले. आभार जान्हवी काळे यांनी मानले. कार्यशाळेसाठी सुप्रिया शिंदे, माधुरी हावळ, रेश्मा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेला उपमहाप्रबंधक व्ही. एम. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

