मोरे, बंदरे यांच्यावर दोन सामन्यांना बंदी

मोरे, बंदरे यांच्यावर दोन सामन्यांना बंदी

Published on

मोरे, बंदरे यांच्यावर दोन सामन्यांना बंदी

ःकेएसएची कारवाई ः शिवशाहू चषक अंतिम सामन्यातील गैरवर्तन भोवले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः संयुक्त जुना बुधवार पेठ फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान करण चव्हाण-बंदरे व ओंकार मोरे यांनी मैदानात गैरवर्तन केले होते. याबद्दलची कारवाई म्हणून कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने (केएसए) या दोन खेळाडूंना यापुढील स्पर्धेतील दोन सामने खेळण्यास बंदी घातली.
गेल्या फुटबॉल हंगामात संयुक्त जुना बुधवार पेठ फाउंडेशनने शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम फेरीतील सामन्यात त्यात दोन्ही संघांमध्ये झालेल्या खेळादरम्यान पाटाकडील तालीम मंडळ (अ) चा खेळाडू ओंकार मोरे व शिवाजी तरुण मंडळचा खेळाडू करण चव्हाण-बंदरे यांनी मैदानात गैरवर्तन केले. गोंधळामुळे हा सामना होऊ शकला नाही.
त्यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करीत मैदानासह बाहेरील तणावग्रस्त वातावरण निवळवले. त्यानंतर आजतागायत हा अंतिम सामना झाला नाही. अन्य संघांसह फुटबॉल रसिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. संघांनीही संबंधित खेळाडूंवर कारवाई करावी, अशी मागणी के.एस.ए.कडे केली होती. त्यानंतर यंदाचा हंगाम सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, पोलिसांनी मागील हंगामातील गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंवर कारवाईचा अहवाल के.एस.ए.कडे मागितला. त्यानुसार के.एस.ए. ‘ए’ डिव्हिजनअंतर्गत शिस्तपालन समितीने या दोन खेळाडूंवर यापुढील दोन सामने खेळण्यास बंदी घातली. यासह दोन्ही संघांना कडक समजपत्रही दिल्याची माहिती के.एस.ए.चे फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com