महापालिका वर्धापनदिन

महापालिका वर्धापनदिन

Published on

महापालिकेतर्फे
उद्यापासून
खाद्य महोत्सव

कोल्हापूर : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारपासून (ता. १३) खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. ताराबाई पार्कातील सासने ग्राऊंडवर सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत सलग तीन दिवस हा महोत्सव होईल.
महोत्सवात शंभर स्टॉलचे नियोजन केले आहे. खाद्य पदार्थांबरोबरच महिला बचत गटांनी बनविलेल्या विविध वस्तूंचीही विक्री व प्रदर्शन होणार आहे. महापालिका तसेच जिल्ह्यातील इतर नगरपरिषद, नगरपालिकांतील नावीन्यपूर्ण उत्पादने असणारे महिला बचत गट त्यामध्ये सहभागी होणार आहेत.
कोल्हापुरी चप्पल, मातीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, हस्तकला वस्तू, रोपवाटिका, हँडमेड ज्वेलरी, नॅपकिन बुके, बांगड्या, ज्वेलरी, चिमणी घरटे उत्पादक, बांगड्या, ज्वेलरी, पर्स, बॅगा अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com