महापालिका- आम आदमी निवेदन

महापालिका- आम आदमी निवेदन

Published on

ताराबाई गार्डनमध्ये सुविधा द्या,
आम आदमी पक्षाचे महापालिकेला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ताराबाई गार्डन हे शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, येथील सोयीसुविधा वाढवाव्यात, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाने उपायुक्त साधना पाटील यांना दिले.
ताराबाई गार्डन येथे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत लँडस्केपिंग करण्यात येणार आहे. हे लँडस्केप प्रशस्त लॉन असलेल्या खुल्या जागेमध्ये आहे. केलेले डिझाईन मुलांना खेळण्यासाठी अडचण करणारे आहे. तसेच येथे भरणाऱ्या योग वर्गास जागेअभावी याची अडचण होणार आहे. तरी याच बजेटमधून गार्डनमध्ये उच्च प्रतीची देशी झाडे, तसेच फुलांची झाडे वापरून सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.
कर्मचारी कमी असल्याने झाडांना वेळेवर पाणी घालणे शक्य होत नाही. यासाठी उद्यान विभागात भरती करावी, लहान मुलांना ट्रॅफिक नियमांची ओळख व्हावी यासाठी उद्यानात ट्रॅफिक लाईटद्वारे सिग्नल सिस्टम लावली आहे; परंतु गेली दोन वर्षे ही सिस्टीम बंद असून, ती त्वरित सुरू करावी. तसेच सिग्नलचे प्रशिक्षण देण्यासाठी आरटीओसोबत मिळून महिन्यातून काही ठराविक दिवस येथे वाहतूक प्रशिक्षण नियम शिकविण्यात यावेत, उद्यानातील झाडांचे शास्त्रीय नामकरण (स्पेसिफिक आणि जेनेरिक नावे) करणाऱ्या पाट्या पुन्हा लावाव्यात, उद्यानाच्या कट्ट्यावर बसून मद्यपान करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी ताराबाई गार्डन परिवार ग्रुपचे कार्यवाह संजय घाटगे-वंदूरकर, सचिव समीर लतीफ, प्रतीक माने, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com