सरकारी सुट्ट्या

सरकारी सुट्ट्या

Published on

नव्या वर्षात २२ सरकारी सुट्या
चार सुट्या रविवारी : प्रजासत्ताक दिनाची पहिलीच सुटी रविवारी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना २२ सुट्या मिळणार आहेत. या संदर्भातील अध्यादेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला. यात पहिलीच प्रजासत्ताक दिनाची सुटी रविवारी येत आहे. दसरा व महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी तर स्वातंत्र्य दिन व पारशी नव वर्ष दिन एकाच दिवशी येत असल्याने या दोन सुट्या शासकीय कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी मिळणार आहेत.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी सुट्यांसंदर्भातील अध्यादेश काढले. यात रामनवमी, गुढीपाडवा व मोहरमची सुटी रविवारी येत आहे. रमजना ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध पोर्णिमेची सुटी सोमवारी येत असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना रविवार व सोमवार अशा सलग सुट्यांची पर्वणी मिळणार आहे. ईद-ई मिलादची सुटी शुक्रवारी आहे तर त्यानंतर दुसरा शनिवार असल्याने सलग तीन दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी मिळणार आहे. बकरी ईदही दुसऱ्या शनिवारी येत असल्याने या सुटीवरही कर्मचाऱ्यांना पाणी सोडावे लागणार आहे. दिवाळीची सुटी २१ व २२ ऑक्टोबर अशी सलग दोन दिवस जाहीर करण्यात आली आहे. बँकांचे अर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च या काळात असते. त्यामुळे बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी १ एप्रिलला सुटी जाहीर करण्यात आली आहे. १ एप्रिल रोजी गुरुवार आहे.
...............
शासकीय सुट्या अशा
वार*तारीख*सुटीचे कारण
रविवार*२६ जानेवारी*प्रजासत्ताक दिन
बुधवार*१९ फेब्रुवारी*छत्रपती शिवाजी महाराज जयंती
बुधवार*३ मार्च*महाशिवरात्री
शुक्रवार*१४ मार्च*होळी (दुसरा दिवस)
रविवारी*३० मार्च*गुढी पाडवा
सोमवार*३१ मार्च*रमजान ईद
रविवार*६ एप्रिल*राम नवमी
गुरुवार*१० एप्रिल*महावीर जन्म कल्याणक
सोमवारी*१४ एप्रिल*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
शुक्रवार*१८ एप्रिल*गुड फ्रायडे
गुरुवार*१ मे*महाराष्ट्र दिन
सोमवार*१२ मे*बुद्ध पौर्णिमा
शनिवार*७ जून*बकरी ईद
रविवार *६ जुलै*मोहरम
शुक्रवार*१५ ऑगस्ट*स्वातंत्र्य दिन
शुक्रवार*१५ ऑगस्ट*पारशी नव वर्ष
बुधवार*२७ ऑगस्ट*गणेश चतुर्थी
शुक्रवार*५ सप्टेंबर*ईद-ए-मिलाद
गुरुवार*२ ऑक्टोबर*महात्मा गांधी जयंती
गुरुवार*२ ऑक्टोबर*दसरा
मंगळवार*२१ ऑक्टोबर*दिवाळी-लक्ष्मीपूजन
बुधवार*२२ ऑक्टोबर *दिवाळी पाडवा
बुधवार*५ नोव्हेंबर*गुरुनानक जयंती
गुरुवार*२५ डिसेंबर*नाताळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com