महापालिका- अमल महाडिक आढावा
फोटो 31017
शहरातील प्रलंबित कामे
शंभर दिवसांत पूर्ण करा
आमदार अमल महाडिक; महापालिकेत घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः शहरातील अमृत योजनेंतर्गत रखडलेली कामे, रस्ते, पाणीपुरवठा पाईपलाईन, भटकी कुत्री, कचरा उठावाची समस्या आदी विविध प्रश्नांसंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंता, जल अभियंता आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आमदार अमल महाडिक यांनी आज बैठक घेतली. येत्या शंभर दिवसांत प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
शहरातील अनेक कामे प्रलंबित असून, नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहराला अखंडित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत योजनेतून उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनची कामे गतीने पूर्णत्वाला न्यावीत. त्यासाठी आवश्यक निधी आणि इतर कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असा विश्वासही आमदार महाडिक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

