आंतरराष्ट्रीय पर्वत दिन

आंतरराष्ट्रीय पर्वत दिन

Published on

फोटो 31025

उलगडला जयंती नदीचा प्रवास
पर्वत दिनानिमित्त कात्यायनी डोंगरावर पर्वत पूजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : जागतिक पर्वत दिनानिमित्त जिल्हा गिर्यारोहण (केडीएमए) संघटनेच्या वतीने आज कात्यायनी डोंगर येथे पर्वत पूजनाचा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने कात्यायनी डोंगरातून उगम होणाऱ्या जयंती नदीचा प्रवासही उलगडला.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी पर्वतदिनाचे महत्त्‍व सांगितले. ते म्हणाले, ‘पर्वतीय परिसंस्था हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. पर्वत, डोंगर यांचे माथे, तेथील अरण्ये, वृक्षसंपदा या संकुलात बहुतांश नद्यांचा उगम होतो. येथे पर्जन्यमान अधिक असते. या डोंगर अरण्यातील पाणलोट क्षेत्रामुळे बहुतांश नद्या प्रवाही राहतात.’
कात्यायनी डोंगराच्या परिसंस्थेमध्ये जयंती नदी उगम पावते. तिचा डोंगरपायथ्यापर्यंतचा प्रवाह शुद्ध पाण्याचा आहे. मात्र, पुढील प्रवाह मानवी हस्तक्षेपामुळे ती पंचगंगा नदीला मिळेपर्यंत प्रदूषित झाला आहे. एकेकाळचा कोल्हापूरचा हा शुद्ध जलस्त्रोत आज नाल्याच्या रूपाने वाहत आहे. अशा जीवनदायिनी छोट्या-मोठ्या नद्यांचे निर्मळ अस्तित्व टिकविण्यासाठी छोट्या-मोठ्या टेकड्या आणि डोंगरांचे नैसर्गिक स्वरूप जपले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत साळोखे यांनी केले. कार्यवाह सागर पाटील यांनी आभार मानले. संघटनेसह मैत्रेय प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, समिट अॅडव्हेंचर, कोल्हापूर हायकर्सचे पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com