करणीच्या नावाखाली लुबाडणूकप्रकरणी महिला पोलिस अटकेत

करणीच्या नावाखाली लुबाडणूकप्रकरणी महिला पोलिस अटकेत

Published on

31035
तृप्ती मुळीक

‘करणी’तून लुबाडणूकप्रकरणी
महिला पोलिसास अटक

म्होरक्या अद्याप पसारच; ८४ लाखांचा ऐवज लुटला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः करणी काढण्याच्या नावाखाली गंगावेश येथील कुटुंबाकडून ८४ लाखांचा ऐवज लुबाडणाऱ्या टोळीतील संशयित महिला पोलिस तृप्ती संजय मुळीक (वय ३५, रा. सिद्धिविनायक पार्क, ओरोस, सिंधुदुर्ग) हिला अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेल्या तृप्तीच्या मागावर असलेल्या राजवाडा पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतले.
फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विविध विधी करण्याच्या नावाखाली फिर्यादी सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७, रा. गंगावेश) यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मुख्य संशयित दादा पाटील महाराजसह नऊ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फिर्यादी सुभाष कुलकर्णी यांच्या घरावर करणी करण्यात आल्याचे भासवून ती काढण्यासाठी दादा पाटील महाराज, नित्यानंद नायक यांनी विविध विधी, पूजा करण्यास भाग पाडले होते. संशयित साथीदार सोनाली पाटील उर्फ धनश्री काळभोर, कुंडलिक झगडे, गोळे, तृप्ती मुळीक हिच्यासह नऊजणांनी अनेकवेळा गंगावेश येथील कुलकर्णींच्या घरी येऊन घरातील दागिने, भांडी, कपडे, लाकडी सामानावर काळी जादू झाल्याची भीती दाखवून त्याचे शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली सर्व काही लुटून नेले. संशयित महिला पोलिस तृप्ती मुळीक हिच्या घरी नेऊनही कुलकर्णी यांना या विधींची माहिती देण्यात आली होती. मुळीक सध्या सिंधुदुर्ग पोलिसांत कार्यरत होती. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब झालेल्या तृप्तीच्या मागावर असलेल्या जुना राजवाडा-कोल्हापूर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com