आंतरराष्ट्रीयसह राज्य नेमबाजीत ‘सक्सेस’ चे यश
31299
कोल्हापूर ः राज्यस्तरीय, आंतरविभागीय विद्यापीठ स्पर्धेत सक्सेस शूटिंग अकादमीच्या नेमबाजांनी यश मिळवले.
............
विविध नेमबाजी स्पर्धेत
सक्सेस अकादमीचे यश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः सक्सेस शूटिंग अकादमीच्या नेमबाजांनी आंतरराष्ट्रीयसह राज्य नेमबाजी स्पर्धेत पदकांची लयलूट केली. विशेषतः शांभवी क्षीरसागर हिने सब यूथ, यूथ, ज्युनियर व सीनिअर अशा चारही गटांत पीपसाईट रायफल प्रकारात विजेतेपद मिळवले, तर अन्य नेमबाजांनीही आठ पदकांची कमाई केली.
शांभवीने यापूर्वी स्पेन, लीमा, पेरू येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतही पदकांची कमाई केली होती, तर केरळ येथे झालेल्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर स्पर्धेत बालाजी नलवडे याने ब्राँझपदक मिळवले. यासह अथर्व भिवसे, वैष्णवी पाटील, पृथ्वीराज घुगे, गौरी चव्हाण, स्वरांजली जाधव, दर्श पाटील, शांभवी क्षीरसागर यांनी १० मीटर एअर रायफल व एअर पिस्टल प्रकारात या सर्वांची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
याबरोबरच दुधाळी येथे झालेल्या आंतरविभागीय विद्यापीठ स्पर्धेत सानिया साठे हिने ५० मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात दुसरा क्रामांक मिळवला. दिव्या धुमाळ हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला. तिची चंदीगड येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व नेमबाजांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

