दत्त जयंती तयारी
फोटो- 31399
दत्त दिगंबर दैवत माझे...
आज दत्तजयंती ः दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः ‘दत्त दिगंबर दैवत माझे...’ ‘दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ असा दत्त महिमा गात शहर व परिसरातील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सव सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. शनिवारी (ता. १४) दत्तजयंतीचा मुख्य सोहळा असून, दिवसभर धार्मिक कार्यक्रम आणि सायंकाळी पालखी सोहळा होणार आहे. दरम्यान, रविवारी (ता. १५) महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
शनिवारी सर्वच दत्त मंदिरात महाअभिषेक, लघुरूद्र, सामुदायिक नामजप, दत्तयाग होणार आहे. सायंकाळी दत्तजन्मकाळ असून, काही मंदिरात दत्त जन्मकाळानंतर कीर्तनाचे आयोजन केले आहे. दत्त जयंती सप्ताहानिमित्त शहर व उपनगरातील दत्त मंदिरात पारायणे, भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांनी दिवस व्यापून गेला आहे. या मंदिरासह शहरातील आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालिंग मंदिर, गंगावेश येथील श्रीकृष्ण दत्त सरस्वती मंदिर, अंबाबाई मंदिरातील दत्तात्रय देवमठ संस्थान, प्रज्ञापुरीतील श्री स्वामी समर्थ मंदिर, कोटीतीर्थावरील श्री स्वामी मंदिर, कसबा बावडा, शाहूपुरी, मिरजकर तिकटी, फुलेवाडी, मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील दत्त मंदिरात दत्त जन्मसोहळा रंगणार आहे. गेल्या आठवडाभरापासूनच त्याची तयारी सुरू असून, सोंगी भजने, भक्तिगीतांची मैफिल, अखंड नामस्मरण आदी कार्यक्रमांनी वातावरणात भक्तीचा सुंगध दरवळतो आहे.
चौकट
लाईव्ह दर्शनासाठी एलईडी स्क्रीन
आझाद चौकातील श्री दत्तभिक्षालिंग मंदिर व गंगावेश येथील श्रीकृष्ण दत्त सरस्वती मंदिरात भाविकांना मंदिराच्या बाहेरूनही दर्शन घेता यावे, यासाठी मंदिराबाहेर एलईडी स्क्रीनची सोय करण्यात येणार आहे.
चौकट
पैजारवाडीला जाणाऱ्या पायी रथयात्रेचे स्वागत
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ते श्रीक्षेत्र पैजारवाडी ही पायी रथयात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली. ठिकठिकाणी रथयात्रेचे स्वागत झाले. त्यानंतर ही रथयात्रा पैजारवाडी कडे रवाना झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

