गड-कार्यशाळा

गड-कार्यशाळा

Published on

जागृती शिक्षणशास्त्रमध्ये
वादविवाद कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर योग्य की अयोग्य या विषयावर वादविवाद कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. सुधाकर शिंदे अध्यक्षस्थानी होते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपली सर्जनशीलता धोक्यात येईल. त्यामुळे तिचा वापर गरजेपुरताच असावा, असे मत डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले. प्रा. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करण्यात आले. त्यांनी वादविवाद स्वरुपात मते मांडली. विनायक माने, सौरभ चव्हाण, शीतल मोहिते, शीतल कुंभार, गौरी चरापले, धनश्री पाटील, ज्योती कुंभार, राणी चौगुले यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाजूने तर आरती मेंगाणे, शिवाजी पाटील, श्रद्धा दुंडगे, कांचन सुरवसे, रोहिणी कोरडे यांनी विरोधात मते मांडली. प्रा. शंकर मगदूम, प्रा. अमित नवले, कृष्णकांत बामणे, विकास बुरुड, विकास कुंभार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com