गड- बालकुमार साहित्य संमेलन

गड- बालकुमार साहित्य संमेलन

Published on

गडहिंग्लजला दुसरे बालकुमार
साहित्य संमेलन ३० ला
गडहिंग्लज, ता. १३ ः येथील वि. दि. शिंदे हायस्कूलच्यावतीने दुसरे बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी (ता. ३०) आयोजित केले आहे. हायस्कूलच्या प्रांगणात संमेलन होईल. ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले अध्यक्षस्थानी असणार आहेत.
सकाळी नऊला शिवाजी चौकातून ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात होईल. त्याचे उद्घाटन विक्रम एज्युकेशनचे जनरल सेक्रेटरी बापूसाहेब शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनातून मराठी भाषेची महती, ज्ञानभांडार, संतसाहित्य भावी पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. साडेअकराला दुसऱ्या सत्रात सूत्रसंचालन नव्या संधी, नव्या दिशा विषयावर किरण पाटील यांचे व्याख्यान होईल. साडेबाराला बाल साहित्यिकांचे कविता वाचन रंगणार आहे. यामध्ये कवी गोविंद पाटील, चंद्रकांत पोतदार, विलास माळी, रवी पाटील सहभागी होतील. दुपारी तीनला गोविंद गोडबोले यांचे कथाकथन होईल. मुलांशी संवादही ते साधणार आहेत. संमेलनात विक्रम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषेपुढील आव्हाने काय आहेत याची माहिती मुलांसह पालकांना संमेलनातून मिळेल. मंगळवारी (ता. ३१) सकाळी आठला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com