गड-परभणी निवेदन

गड-परभणी निवेदन

Published on

फोटो क्रमांक : gad134.jpg

31354
परभणीप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा
गुन्हा दाखल करण्याची मागणी

गडहिंग्लज, ता. १३ : परभणी येथे संविधान शिल्पाची नासधूस करून तमाम भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
परभणीला संविधान शिल्पाची नासधूस केल्याच्या घटनेचे पडसाद उमटत आहेत. संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनातून केली. वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दलित महासंघ, मुक्ती संघर्ष समिती, भीमशक्ती सामाजिक संघटना, भारतीय बौद्ध महासभा, शिवसेना आदी संघटनांतर्फे निवेदन दिले. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ‌अर्जुन दुंडगेकर, संतोष सुळकुडे, परशुराम कांबळे, दिलीप कांबळे, प्रकाश कांबळे, प्रीती कांबळे, रमेश शिंगे, दिगंबर विटेवरी, संतोष कांबळे, एस. के. कांबळे, विजय शिरगावकर, वसंत शेटके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com