इचल : टुडे पान दोनसाठी

इचल : टुडे पान दोनसाठी

Published on

धनादेश भरलेल्या दिवशीच क्लिअरिंग
नववर्षापासून कार्यवाही; व्यापारी वर्गाला फायदा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. १३ : नववर्षापासून धनादेश भरलेल्या दिवशीच समाशोधन (क्लिअरींग) प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे धनादेशाची रक्कम त्याच दिवशी संबंधित बँक खात्यावर जमा होणार आहे. याबाबत इचलकरंजी पाॅवरलूम असोसिएशनच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने याबाबतची पूर्वसूचना दिली होती. आता प्रत्यक्षात त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या बदलामुळे व्यापारी वर्गाला चांगला फायदा होणार आहे.
पॉवरलूम असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रमुखांकडे ज्या-त्या दिवशी समाशोधन जमा मिळावे, यासाठी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती. यातील तांत्रिक अडचणींबाबत चर्चा झाली होती. दोन ते तीन वर्षांतील सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समाशोधन रोजच्या रोज जमा देण्याबाबत बँकिंग क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय घेतला.
या निर्णयामुळे भांडवलाची अतिरिक्त उपलब्धता होणार आहे. त्यामुळे उद्योग व व्यापार करणे अधिक गतिमान व सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर कर्जावरील व्याजाची बचत होणार आहे. यापूर्वी समाशोधनसाठी धनादेश बँकेत जमा केल्यानंतर संबंधित रक्कम तिसऱ्या दिवशी आणि जर बँकेस सुटी असेल तर ती चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पैसे वापरात येत होती. पण या निर्णयामुळे तीन तासांच्या सायकलमध्ये ज्या-त्या दिवशी पैसे खात्यावर जमा होणार आहेत. त्यानंतर ते पुढील व्यवहारासाठी वापरता येणार आहेत.
----
चौकट
अतिरिक्त १०० कोटी उपलब्ध होणार
मध्यंतरीच्या कालावधीत सर्व बँकांना त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल, कर्मचारी प्रशिक्षण, तांत्रिक माहिती, कार्यशाळा आदींचे आयोजन केले होते. येत्या १ जानेवारीपासून रोजच्या रोज समाशोधन जमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदलामुळे फक्त इचलकरंजीमध्ये ७५ ते १०० कोटी रूपये अतिरिक्त रोज उपलब्ध होणार आहेत.
----
कोट
यापूर्वीही इचलकरंजीतून अनेक ऐतिहासिक निर्णयाची नांदी झालेली आहे. बँकिंग क्षेत्रातील रोजच्या रोज समाशोधन मिळणे हा ऐतिहासिक निर्णय इचलकरंजीकरांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण भारताला मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.
- चंद्रकांत पाटील, अध्यक्ष ः दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com