अंबाबाई मंदिरातील दत्त मंदिरात जन्म सोहळ्यासाठी प्रवेश द्यावा

अंबाबाई मंदिरातील दत्त मंदिरात जन्म सोहळ्यासाठी प्रवेश द्यावा

Published on

अंबाबाई मंदिरातील दत्त मंदिरात जन्म
सोहळ्यासाठी भाविकांची अडवणूक नको

ठाकरे गटाचे देवस्थान समितीस निवेदन

कोल्हापूर, ता. १३ ः करवीर निवसिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळ्यासाठी रात्री १२ वाजता येणाऱ्या भाविकांची अडवणूक करू नका, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे, अंबाबाई मंदिरात दत्तमहाराज जन्मकाळ सोहळा रात्री बारा वाजता साजरा होतो. हा सोहळा साजरा करताना ठराविकच भाविकांना त्यांचे आधार कार्ड पाहून ओळख असणाऱ्या भाविकांना सोडले जाते. वास्तविक हा सोहळा हिंदू भाविकांच्या भक्तीचा व आस्थेचा भाग आहे. यामुळे दत्त महाराज जन्मकाळ सोहळ्यास सर्वच भाविकांना रात्री बारा वाजता मंदिरात प्रवेश द्यावा. निवेदनावर शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com