राज्य नाट्य स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धा

Published on

कॉलम राज्य नाट्य स्पर्धा
---
फोटो 31418

‘म्याडम''
निखळ, निरागस मनोरंजन

अजूनही विनोद ऐकला जातो, वाचला जातो. विनोदामुळे रसिक, प्रेक्षक खूशही होतात. पण, इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रूढ झाला नाही. काही नवलेखक आपल्या साहित्यकृतीतून विनोद निर्मिती करण्याचा मार्ग चोखाळत आहेत. यापैकीच हृषिकेश तुराई यांनी लिहिलेली ‘म्याडम'' ही एकांकिका... जिचं नाट्यरूपातील सादरीकरण देवल क्लबच्या वतीने करण्यात आलं. उत्तम निरीक्षण असेल तर सहज विनोद सुचतो. या विनोदाचं निरागस, निखळ दर्शन अनुपम दाभाडे दिगदर्शित ‘म्याडम'' या महिलाप्रधान नाट्य प्रयोगात झालं.

नाटकात चारच पात्रे, तिही महिला. पण, चौघींनी जी काही धमाल उडवून दिली ती खरच अविस्मरणीय. एकांकिकेची नाट्यरूपातील मांडणी थोडी संथ झाली; पण पात्रांची एकमेकांशी असणारी कॉमेडी केमिस्ट्री व त्यावर असणारी दिग्दर्शकीय पकड परफेक्ट होती. प्रयोग संथ झाला की, अभिनयात तोचतोचपणा येण्याची शक्यता इथेही थोड्या फार प्रमाणात डोकावली असली तरीही त्यात सहजता होती, हे नाकारता येणार नाही. धुणीभांडी करणा‍ऱ्या बाईला आपल्या मुलीने खूप शिकून म्याडम व्हावं असं वाटत असतं. त्यांच्या भाषेचा लहेजा हा ग्रामीण असल्यामुळेच नाटकाच नाव याला साजेस अर्थातच ‘म्याडम’ असं आहे.
धुणीभांडी करून पोट भरणा‍ऱ्या मंगलची मुलगी सुमनला शिक्षणात रस नसल्यामुळे दहावीच्या परीक्षेला ती घाबरते. इंग्रजीच्या पेपरवेळी ती पळून जाते. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या चिंगीच्या आणि रुक्मिणीच्या मदतीने मंगलने सुमन दहावी पास व्हावं यासाठी केलेला प्रयत्न आणि यातून झालेली त्यांची धावपळ विनोदी अंगाने दाखवण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शकाने केला.
तसं पहायला गेलं तर या कथानकाचा जीव अगदी कमी. पण, कलाकारांनी नैसर्गिक विनोदाचा बाज शेवटपर्यंत कायम राखत, कमी शिकलेल्या आईने शिक्षणाच्या बाबतीत दिलेला विचार अंतर्मुख करणारा होता. अभिनयात कलाकारांनी चांगली मजल मारली. सुमन आणि चिंगी या दोघींनाही वयाच्या मानाने भूमिकेची समज चांगली होती. या दोघींनी रंगभूमीवर खऱ्या अर्थाने कमाल केली. दोघींचाही रंगमंचीय वावर अनुभवी आणि सहज होता. मंगलची मध्यवर्ती भूमिका असावरी नागवेकर यांनी सुरेख वठवली. रुक्मिणीने आपली जबाबदारी सांभाळली.
धुणीभांडी करणा‍ऱ्या मंगलच्या घराची रचना अगदी बारकाईने केली होती. काही प्रसंगांत घेतलेली गाणी, यामुळे पिकलेला हशा आणि टाळी दिग्दर्शकाच्या कल्पकतेचं दर्शन देऊन गेली. प्रत्येक प्रसंगाला साजेशी प्रकाश योजना आणि संगीत यांचा मेळ अगदी जमून आला होता. डोंगराच्या प्रतिमेची रचना, रुक्मिणीच्यां उच्चभ्रू घराची कल्पना साजेशी होती. इंग्रजी भाषेतील अल्फाबेटस तिच्याभोवती सतत नाचणं आणि तिच्याच घराच्या भिंतींवर अ‍सणाऱ्या अल्फाबेटसची केलेली रचनाही सूचक होती.


दिग्दर्शक : अनुपम दाभाडे

पात्र परिचय
रुक्मिणी : गायत्री कुंभार
चिंगी : त्रिवेणी ठाकुरदेसाई
सुमन : वैष्णवी पोतदार
मंगल : असावरी नागवेकर

तंत्रज्ञ
ैनेपथ्य : गायत्री कुंभार, ओंकार मासारणकर
प्रकाश योजना : अर्जुन पिसाळ
पार्श्वसंगीत : अनुपम दाभाडे
संगीत संयोजन : प्रथमेश बारस्कर
वेशभूषा : श्वेता खटावकर
रंगभूषा : अवधूत सावंत
----------------
स्पर्धेत आज...
० नाटक : पद्मश्री धुंडिराज
० संस्था : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय
० स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, वेळ : सायंकाळी सात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com